‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेतील अभिनेता राम कपूरचे वडील अनिल कपूर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
राम कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर ‘तुम्ही कायमच कुटुंबाचा एक भाग राहणार आहात. अनिल कपूर (१९४७-२०२१)’ असे लिहिले आहे.
View this post on Instagram
तसेच राम कपूरने हा फोटो शेअर करत ‘अमूलने माझ्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. मला तुमची खूप आठवण येईल’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
राम कपूरच्या पोस्टवर अनेक कलाकरांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच राम कपूरची पत्नी गौतमी कपूरने देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ही भावूक पोस्ट शेअर करत तिने सासरे अनिल कपूर यांनी त्यांचा बिझनेस कसा उभा केला याबाबद्दल सांगितले आहे.
राम कपूरचे वडील अनिल कपूर हे इंडस्ट्रीमध्ये ‘बिली’ या नावाने ओळखले जायचे. ते FCB ULKA जाहिरात कंपनीचे CEO होते. अमूल या कंपनीचे एक क्लायंट होते. अमूलची टॅग लाईन ‘अमूल द टेस्ट ऑफ इंडिया’ ही देखील अनिल कपूर यांनीच दिली होती.