गेल्या काही काळापासून कलाविश्वात ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांच्या निर्मितीचा एक नवा ट्रेण्ड आला आहे. यामध्ये ‘पानिपत’, ‘तान्हाजी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतरच प्रसिद्ध निर्माते मधू मंटेना ‘रामायण’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन आणि रणबीर कपूर झळकणार असल्याचे बोललं जात आहे. ‘रामायण’ या चित्रपटाचे बजेट सुमारे ७५० कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या कलाविश्वात आणि सोशल मीडियावर मधु मंटेना यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन झळकणार आहेत. ‘रामायण’ हा थ्रीडी चित्रपट असल्याने याचं बजेट ७५० कोटींपेक्षा जास्त आहे. या चित्रपटासाठी हृतिक रोशन आणि रणबीर कपूर यांना मोठी रक्कम दिली जाणार आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी दोन्ही कलाकारांना ७५ कोटी रुपये मिळणार असल्याचे बोललं जात आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर हृतिक रोशन हा रावणाची भूमिका साकारणार असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी फार मेहनत घेतली जात आहे. या चित्रपटाच्या सेटची निर्मिती भव्यदिव्य प्रकारे केली जाणार आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘रामायण’ या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण सीतेची भूमिका साकारणार आहे. आता प्रभू रामाची भूमिका रणबीर कपूर साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र या कलाकारांना फार मोठी रक्कम मानधन म्हणून दिली जाणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, ‘रामायण’पूर्वी दीपिका आणि हृतिक ही जोडी ‘फायटर’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट देशभक्तीपर आधारित असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे.