आलिया भट आणि रणबीर कपूर ही जोडी सध्या चित्रपटप्रेमींच्या मनावर राज्य करत आहे. हे दोघे कायमच चर्चेत असतात मग ते त्यांच्या अफेअरमुळे असू दे किंवा त्यांच्या चित्रपटांमुळे…पण आता हे दोघे चर्चेत येण्याचं कारण वेगळंच आहे. ते चर्चेत आहेत त्यांच्या नव्या लूकमुळे….
या त्यांच्या नव्या लूकमध्ये आलिया अगदी नवरीसारखी नटली आहे तर रणबीर मात्र अगदी जख्ख म्हातारा दिसत आहे. जाहिरातीसाठी या दोघांनीही हा नवा लूक केल्याचं समोर येत आहे. दोघेही वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये काम करत आहेत.आलियाने आपली ही जाहिरात शेअर केली आहे. एका चॉकलेटच्या ब्रँडची ही जाहिरात आहे. यात आलिया नवरी झाली आहे तर ‘थप्पड’ चित्रपटातला पवैल गुलाटी तिचा नवरा झाला आहे. यात आलियाने बदामी रंगाचा पोशाख परिधान केला आहे आणि ती लग्नातला वरमाला हा विधी करताना दिसत आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांना आलियाचा हा लूक फारच आवडलेला दिसत आहे. काही जणांनी आलियाला “सर्वात सुंदर नवरी”, असं म्हटलं आहे. तर आलियाच्या एका चाहत्याने तिला विचारलं आहे की, “खरोखर नवरी कधी होणार आहेस?” तर एका चाहत्याने इतकं बारीक निरीक्षण केलं आहे की तो म्हणतोय, “या नवरीच्या पोशाखाला तर खिसेही आहेत.”
फक्त आलियाच नाही तर रणबीरही या लूकमध्ये चाहत्यांचं मन जिंकत आहे. एका मोठ्या रंगाच्या ब्रँडसाठीच्या या जाहिरातीत रणबीर डबल रोलमध्ये दिसत आहे. यात तो एका वृद्ध व्यक्तीची भूमिका करताना दिसत आहे. एका चाहत्याने सोशल मीडियावर या दोन्ही जाहिराती शेअर करत “अरे देवा, आता हे कोणी केलं”, असं म्हणत थट्टा केली आहे.
View this post on Instagram
ही लोकप्रिय जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटातून दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे या दोघांचे फोटोजही व्हायरल होत होते.