बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया आणि रणबीर कपूर हे रिलेशनशिपमध्ये आहेत. ते बऱ्याचवेळा एकत्र दिसतात. त्या दोघांनी नुकताच ‘ब्रह्मास्त्र’चा मोशन पोस्टर लॉन्चच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी सगळ्यासमोर रणबीरने आलियाचा अपमान केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

त्याचा व्हिडीओ आलियाच्या एका फॅनक्लबने शेअर केला आहे. या व्हिडीओत रणबीर आणि आलिया दोघेही स्टेजवर असतात. यावेळी रणबीर आलियाला विचारतो की “तिला कसं वाटतयं इथे येऊन.” यावर आलिया म्हणाली, “मी खूप भावूक आहे. हा एक रोमांचक आणि भावनिक क्षण आहे.” यावर रणबीर बोलतो, “पण तू भावनिक का झाली आहेस? तू अजून पोस्टरमध्ये सुद्धा दिसली नाहीस.” रणबीरचे हे वाक्य ऐकून आलिया चकित होते. तेव्हा आलिया म्हणते, “कारण तू पोस्टरमध्ये आहेस, म्हणून मी भावूक झाली.” त्यांच्यात झालेल्या या विनोदाने उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हसू लागले.

आणखी वाचा : फोटो काढण्यासाठी आलेल्या पोलिसाला हटकल्यानंतर ; अक्षयने केलेल्या कृत्याचे होतयं कौतुक

आणखी वाचा : लग्नानंतर अंकिताला पती विकीने भेट म्हणून दिलं ५० कोटींच ‘हे’ गिफ्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. हा चित्रपट तीन भागात बनवला जाणार आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये पहिला भाग येईल. या चित्रपटात रणबीर कपूर शिवाची भूमिका साकारत आहे. मोशन पोस्टरमध्ये रणबीर कपूरचा इंटेन्स लूक दिसत असून प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे.