बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यातील प्रेमसंबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. पण त्यांच्या या नात्याची आपल्या आगामी चित्रपटाच्या विक्रीसाठी काहीच मदत होणार नसल्याचे निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरने म्हटले आहे.
रणबीर-कतरिना हे दोघे ‘जग्गा जासूस’ चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. बॉलीवूडमधील टॉप जोड्यांमध्ये या प्रेमीयुगुलाचे नाव घेतले जाते. याचा फायदा तिकीट बारीवर चित्रपटाच्या विक्रीसाठी होईल का? असा प्रश्न केला असता सिद्धार्थ म्हणाला की, मला नाही वाटत. चित्रपटाची कथा त्याच्या विक्रीसाठी जास्त महत्त्वाची ठरेल. दिग्दर्शक अनुराग बासू आणि रणबीर हे ‘बर्फी’नंतर पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. त्यामुळे सर्वांनाच त्याची उत्सुकता आहे. दरम्यान, अनुराग आणि कतरिना यांच्यात काही वाद असल्याची बाब ही केवळ अफवा असल्याचे सिद्धार्थने म्हटले आहे.
रणबीर-कतरिनाने याआधी अजब प्रेम की गजब कहानी आणि राजनिती या चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘जग्गा जासूस’ चित्रपटाद्वारे रणबीर निर्मिती क्षेत्रात प्रवेश करतोय.
संग्रहित लेख, दिनांक 10th Aug 2015 रोजी प्रकाशित
‘चित्रपटाच्या विक्रीसाठी रणबीर-कतरिनाच्या नात्याची मदत होणार नाही’
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यातील प्रेमसंबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत.

First published on: 10-08-2015 at 11:18 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor katrina kaifs relation wont help selling a film siddharth roy kapur