मुंबईमध्ये करोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अद्याप करोनाचं संकट टळलेलं नाही. यातच आता बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर येतंय. बॉलिवूडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, वरुण धवन, अर्जुन कपूर यांच्यानंतर आता रणबीर कपूरला करोनाची लागण झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.
पिंकविलाच्या वृत्तानुसार रणबीर कपूर आजारी आहे. सध्या तो क्वॉरंटाइन असून आराम करतोय. पिंकविलाने रणबीरचे काका रणधीर कपूर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रणबीरला करोना झालायं का या प्रश्नावर त्यांनी आधी “होय” असं उत्तर दिलं. मात्र रणबीरला करोना झालाय की नाही याची खात्री नसल्याचं ते लगेचच म्हणाले. रणबीर सध्या आजारी आहे आणि तो आराम करत आहे. मात्र त्याला करोना झालाय की नाही हे माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
या बातमीनंतर रणबीरच्या चाहत्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. तसचं आलिया भट्ट आणि आयान मुखर्जीच्या चाहत्यांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. कारण नुकतच आलिया भट्ट, आयान मुखर्जी आणि रणबीर कपूर आगामी सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ च्या सेटवर एकत्र दिसले होते. या सेटवरील फोटो आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.
View this post on Instagram
‘ब्रह्मास्त्र’ सोबत रणबीर सध्या दिग्दर्शक संदिप रेडी वंगा यांच्या ‘ऍनिमल’ या सिनेमातून झळकणार आहे. तसचं करण मल्होत्राच्या ‘शमशेरा’ मध्ये एका वेगळ्या अंदाजात तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपूर्वीचं रणबीर कपूरची आई अभिनेत्री नितू कपूर यांनादेखील करोनाची लागण झाली होती.