मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे कोकणात पूर परिस्थिती निर्माण झाली. कोकणात निर्माण झालेल्या पूर पस्थितीमुळे नागरिकांना २००५च्या पुराची आठवण झाली. त्यामुळं नागरिक धास्तावले आहेत. अनेक सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिक पाण्यात अडकले. यात ‘रंग माझा वेगळी’ मधली आयेशा म्हणजे अभिनेत्री विदिशा म्हसकर ही सुद्धा पूरामुळे कोकणात अडकली. यावेळी आपल्या डोळ्यासमोर कोकणवासियांचे होत असलेले हाल पाहून त्यांच्या मदतीसाठी सुद्धा पुढे सरसावलीय.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत सध्या सासू-सूनेमध्ये सारं काही अलबेल दाखवत असले तरी कार्तिक-दिपाच्या नात्यात जिच्यामुळे नवा ट्विस्ट आलाय त्या ‘आयेशा’ ची भूमिका अभिनेत्री विदिशा म्हसकर हिने साकरलीय. आपल्या चूलबूल अंदाजात तिने हे पात्र अतिशय उत्कृष्टपणे साकारलंय. अभिनेत्री विदिशा म्हसकर ही सध्या महाड इथे आहे. मुसळधार पावसामुळे कोकणातल्या नद्यांना पूर आला. यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाले आहेत. ही सगळी परिस्थिती लोकांसमोर आणण्यासाठी नुकतंच ‘रंग माझा वेगळा’ फेम विदिशा म्हसकर हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओंमध्ये ती राहत असलेल्या सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्या चक्क पाण्याखाली गेलेल्या दिसून येत आहेत. तिच्या घरासमोरच असलेल्या महाड चवदार तळ्याची देखील दृश्य तिने या स्टोरीमध्ये दाखवली आहेत. तसंच ती आणि तिचे कुटुंब सुरक्षित असून काळजी करू नका, असं आवाहन देखील तिने या स्टोरीमधून केलंय,

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Saara Kahi Tichyasathi Fame Actor Abhishek Gaonkar engaged with social media sonalee patil
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारशी मोठ्या थाटामाटात साखरपुडा, दोघांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

कोकणातील ही परिस्थिती पाहून अभिनेत्री विदिशा म्हसकर लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावलीय. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरूनच आणखी बरेच व्हिडीओ शेअर करून कोकणाला मदत करण्याचे आवाहन केलंय. कोकणकरांच्या या आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यापर्यंत अन्न पदार्थ, जीवनावश्यक वस्तू, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्त्रे, अंथरूण-पांघरुण पर्यंत प्रत्येक मदत कुठे आणि कशी मिळेल यासाठीची आवश्यक माहिती सुद्धा ती तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून लागोपाठ शेअर करतेय.

vidisha-mhaskar-helping-hand-instagram-story
(Photo: Instagram/vidishamhaskar)

कोकणकरांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या ‘एकता मंच’ या संस्थेची माहिती आणि त्याचे काही संपर्क क्रमांक देखील तिने या स्टोरीमधून शेअर केली आहे. त्याचप्रमाणे महाडकरांसाठी सध्या पाणी आणि खाद्यपदार्थांसाठी आवश्यक तितकी मदत मिळत आहे. परंतु ओषधे, टॉवेल नॅपकीन्स, टॉर्च, फ्लोअर व्हायपर, कपडे, मेणबत्त्या, माचिस आणि महिला-पुरूष तसंच लहान मुला-मुलींचे अंतवस्त्रे या वस्तूंसाठी गरज मोठ्या प्रमाणात गरज असून नागरिकांनी पुढे येऊन या वस्तू महाडकरांपर्यंत पोहोचवावेत, असं आवाहन देखील अभिनेत्री विदिशा म्हसकर हिने केलंय.

vidisha-mhaskar-instagram-post
(Photo: Instagram/vidishamhaskar)

 

यासोबतच अभिनेता भरत जाधवने सुद्धा शक्य होईल त्या मार्गाने कोकणात मदत पाठवण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.  ‘आपले कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरते नाही. या पूरसंकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या,’ म्हणत भरत जाधवने पोस्ट शेअर केली आहे. रायगडमधील महाडमध्ये आणि कोकणच्या चिपळूणमध्ये पूराची स्थिती उद्भवल्याने अनेक कुटुंब घरात अडकून पडली आहेत. पुरात आणि भूस्खलनामुळे ढिगा-याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.