मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी नव्वदच्या दशकापासून वैविध्यपूर्ण भूमिका साकारते आहे. २०१४ साली आलेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटातून राणी मुखर्जी पोलीस अधिकारी शिवानी रॉय म्हणून अॅक्शन भूमिकेतून मोठ्या पडद्यावर आली आणि तिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने थक्क केले. आता या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण होत असताना, यश राज फिल्म्सने राणीच्या ‘मर्दानी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. ‘मर्दानी’ चित्रपटाचा दुसरा भाग २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘मर्दानी २’ प्रदर्शित झाल्याच्या पाच वर्षांनंतर यश राज फिल्म्सने २२ ऑगस्ट रोजी ‘मर्दानी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करत समाज माध्यमांवर एक ध्वनीचित्रफीतही पोस्ट केली आहे.

हेही वाचा >>> एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
Tejaswini Pandit film Yek Number will be screened on october 10
तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ चित्रपटाचे १० ऑक्टोबरला प्रदर्शन
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या

‘मुंबईमध्ये महिला पोलिसांसाठी ३३ टक्के राखीव पदं आहेत. ही पदं लवकरात लवकर भरली जाणं आवश्यक आहे आणि मी या चित्रपटाच्या निमित्ताने आवाहन करते की अधिकाधिक महिलांनी पोलीस दलात भरती व्हावं आणि समाज हितासाठी मदत करावी’ असं आवाहन या चित्रपटाच्या निमित्ताने राणीने केलं आहे. स्त्रियांना पोलीस दलात काम करण्याची प्रेरणा मिळावी हा आपला या चित्रपटामागचा हेतू असल्याचे राणीने समाजमाध्यमांवर स्पष्ट केले आहे. या चित्रपटात मी साकारलेल्या शिवानी रॉय या मुख्य पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेवरून प्रेरित होऊन एखादी महिला प्रत्यक्षात पोलिस दलात भरती झाली तर या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटेल, अशी भावनाही राणीने व्यक्त केली आहे. ‘मर्दानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राणी मुखर्जीचा अॅक्शन अवतार प्रेक्षकांना अनुभवता आला. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’चे दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केले होते. तर २०१९ साली आलेल्या सिक्वेलचे दिग्दर्शन गोपी पुथरन यांनी केले होते. आता तिसऱ्या सिक्वेलपटाचे दिग्दर्शन कोण करणार याचीही उत्सुकता आहे.