अभिनेता रणवीर सिंह त्याच्या चाहत्याचं मनोरंजन करण्यासाठी कोणतीच कसर शिल्लक ठेवत नाही. नुकतंच त्याने आईच्या वाढदिवसाला असंच काही केलंय की त्याचा हा मनमौजी अंदाज पुन्हा एकदा समोर आला. एका रेस्तरॉंमधला त्याचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माइल आल्याशिवाय राहणार नाही.

रणवीर सिंहने त्याच्या आईच्या वाढदिवशी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीतला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंहने उत्साहाच्या भरात अंगावरचं शर्ट काढून आईसोबत ‘दिल चोरी साड्डा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. या व्हिडीओमध्ये माय-लेकाची बॉण्डिंग पाहून आजूबाजूचे पाहुणे सुद्धा त्याच्या आईला डान्स करण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसून आले. यावेळी रणवीर डान्स स्टेप व्यतिरिक्त काही मजेदार मुव्ह देखील करताना दिसून आला.

अगदी बेधुंद होऊन रणवीरला डान्स करताना पाहून त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोण सुद्धा बघतच राहिली. या व्हिडीओमध्ये तो दीपिकासोबत मस्ती करताना दिसून येतोय. दीपिकाला सुद्धा डान्स करण्यासाठी तो बोलवतो. ‘नशे सी चढ गई’ या गाण्यावर रणवीर आणि दीपिका दोघांनीही अफलातून डान्स केला.

रणवीरच्या आई अंजू यानी रक्षाबंधनच्या दिवशी आपला वाढदिवस साजरा केला. त्यांचा वाढदिवस आणखी स्पेशल बनवण्यासाठी ते आपल्या कुटूंबीयांसह एका रेस्तरॉंमध्ये पार्टी आयोजित केली होती. यावेळी रणवीरच्या आई अंजू यांनी ग्रीन आउटफ‍िट परिधान केला होता.

दीपिका-रणवीरचा स्टायलिश लूक

कपड्यांच्या स्टाइलमुळे नेहमीच ओळखला जाणाऱ्या रणवीरने यंदा मात्र काही खास प्रकारचे आउटफिट परिधान केले नव्हते. एका व्हाइट टी-शर्टवर त्याने डेनिम जॅकेट आणि ब्लॅक जीन्स परिधान केली होती. तर दीपिका सुद्धा आपल्या सासूच्या वाढदिवशी एका वेगळ्याच लूकमध्ये दिसून आली. तिने रेड टॉपसोबत लेदर पॅन्ट परिधान केली होती.

आणखी वाचा : KBC 13: इस्रोमध्ये जाण्याचे स्वप्न पाहणारे ज्ञान राज बनले पहले स्पर्धक, जिंकले इतके लाख रूपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणवीरचे नवे चित्रपट

रणवीर आणि दीपिका हे दोघेही लवकरच ‘८३’ या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट याच वर्षी रिलीज करण्यात येणार आहे. याशिवाय ‘जयेशभाई जोरदार’, ‘सर्कस’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात रणवीर झळकणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी त्याने अभिनेत्री आलिया भट्टसोबत शूटिंग सुरू केली आहे.