छोट्या पडद्यावरील कायमच चर्चेत असलेला शो म्हणजे बिग बॉस. या शोच्या लोकप्रियतेमुळेच गेल्या वर्षी बिग बॉसचं ओटीटी वर्जन लॉन्च करण्यात आलं होतं. अनेक कारणांमुळे बिग बॉस ओटीटी शो देखील चांगलाच चर्चेत राहिला. कधी स्पर्धकांमधील वाद तर कधी होस्ट करण जोहरच्या विधानांमुळे शो चर्चेत आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा बिग बॉस ओटीटी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र यंदाच्या सिझनमध्ये होस्टच्या भूमिकेत करण जोहर झळकणार नाही. या सिझनचा होस्ट म्हणून रणवीर सिहंच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन करण जोहर होस्ट करणार नसल्याने होस्ट म्हणून अनेक नावं पुढे आली होती. यात खास करुन रणवीर सिंहचं नाव अधिक चर्चेत होतं. मात्र रणवीर बिग बॉस ओटीटी शो होस्ट करणार नसल्याचं आता समोर आलं आहे. “रणवीर सिंह सध्या अनेक सिनेमांच्या कामांमध्ये व्यस्त आहे. रणवीरच्या या खास सिनेमांची लवकरच घोषणा होईल” अशी माहिती सूत्रांनी ईटी टाईम्सला दिली आहे.

तर बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनसाठी अनेक नावं चर्चेत आली आहेत. शोच्या मेकर्सनी सेलिब्रिटींना विचारणा करण्यास सुरुवात केलीय. यंदाच्या सिझनमध्ये कांची सिंह, पूजा गौर आणि महेश शेट्टी यांची नावं चर्चेत आली आहेत. याशिवाय शोच्या मेकर्सनी पूनम पांडे आणि संभावना सेठ या दोघींनाही शोसाठी विचारणा केलीय. मात्र पूनम आणि संभावनाने अद्याप या चर्चांवर मौन बाळगलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिव्या अग्रवाल बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनची विजेता ठरली होती. तर निशांत भट उपविजेता ठरला होता.