बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहच्या पुढच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आदित्य धर दिग्दर्शित त्याच्या पुढच्या चित्रपटाची पहिली झलक अद्याप प्रदर्शित झालेली नाही; परंतु सोशल मीडियावर लीक झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दलची तुमची उत्सुकता अनेक पटींनी वाढणार आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही चित्रपटातील रणवीर सिंह आणि संजय दत्तचा फर्स्ट लूक पाहू शकता, ज्यामध्ये रणवीर सिंह आणि संजय दत्त दोघेही अतिशय डॅशिंग अवतारात दिसत आहेत.

रणवीर सिंह आणि संजय दत्तचा आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट ‘धुरंधर’मधील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रणवीरचा हा लूक आपल्याला त्याच्या जुन्या चित्रपट ‘पद्मावत’मधील अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेची आठवण करून देतो. संजयचा लूकही खूप दमदार दिसत होता.

रणवीर-संजयचा लूक सोशल मीडियावर झाला लीक

‘धुरंधर’ चित्रपटाचा पडद्यामागील व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. रणवीर सिंहचा लूक तुम्हाला ‘पद्मावत’ चित्रपटातील त्याच्या अलाउद्दीन खिलजी लूकची आठवण करून देईल. व्हिडीओमध्ये रणवीर जाड काळ्या रंगाच्या पोशाखात एका प्रभावी शैलीत चालताना दिसत आहे. हे सर्व रणवीर आणि संजय दत्तच्या पुढील चित्रपट ‘धुरंधर’ची तयारी आहे. चित्रपटाचा हा लीक झालेला व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये संजय दत्तदेखील दिसला आहे. संजय पांढरा पठाणी कुर्ता आणि शाल घेऊन उभा होता. संजय दत्तच्या खांद्यावरील शाल तुम्हाला त्याच्या ‘कलंक’ या चित्रपटाची आठवण करून देईल. ‘धुरंधर’ चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही पण हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होईल असा विश्वास आहे.

‘धुरंधर’ हा चित्रपट ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’चे दिग्दर्शक आदित्य धर बनवत आहेत. या चित्रपटाची घोषणा जुलै २०२४ मध्ये करण्यात आली होती. रणवीरने या चित्रपटाची घोषणा करताना इन्स्टाग्रामवर लिहिले होते, “हे माझ्या चाहत्यांसाठी आहे. हा एक खास सिनेमॅटिक अनुभव असेल.”

या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, रणवीर सिंह आणि संजय दत्तव्यतिरिक्त चाहत्यांना या चित्रपटात आर. माधवन, अक्षय खन्ना व अर्जुन रामपालदेखील दिसतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.