रणवीर सिंह हा बॉलीवूडमधील लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. त्याच्या अभिनयाने लोक प्रभावित होतात. नुकतेच ‘सिम्बा’ चित्रपटात काम केलेले विजय पाटकर म्हणाले की, रणवीर सिंह सेटवर खूप मेहनत करतो.
दीपिका पदुकोणशी लग्न करण्यापूर्वी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी रणवीर एका दिवसात २० तासांपेक्षा जास्त वेळ शूटिंग करायचा, त्या काळच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.
फिल्मिमंत्रा मीडियाच्या यूट्यूब चॅनेलशी बोलताना विजय पाटकर म्हणाले, “रणवीर सेटवर त्याच्या वरिष्ठांचा खूप आदर करतो. जेव्हा एखादा वरिष्ठ त्याच्याशी बोलतो तेव्हा तो फक्त शांत बसतो आणि लक्षपूर्वक ऐकतो. तो कधीच मी स्टार असल्यासारखा वागत नाही. तो खूप चांगला श्रोता आहे, म्हणूनच तो चांगले काम करतो.”
विजय ‘सिम्बा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाची आठवण सांगत म्हणाले की, रणवीर फक्त दोन तास झोप घेऊन काम करायचा. ते म्हणाले, “मी ते ‘सिम्बा’दरम्यान पाहिले होते.” मी रणवीरला त्याच्या डोळ्यांकडे पाहण्यास सांगितले. त्याच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स होते. तो म्हणाला, काय करू? मी लग्न करत आहे. आता ते करावे लागेल. त्याचे लग्न होणार होते, त्यामुळे आमचे वेळापत्रक निश्चित होते आणि तोपर्यंत आम्हाला शूटिंग पूर्ण करायचे होते.”
रणवीर सिंह फक्त दोन तास झोपायचा
ते पुढे म्हणाले की, सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तो पोलिस ठाण्यात फाइट सीन चित्रीत करत असे आणि ते पूर्णपणे फिजिकल अॅक्शन होते. मग तो संध्याकाळी ६ वाजता जिममध्ये जायचा आणि रात्री ८:३० वाजता सेटवर परतायचा. ‘आँख मारे’ या गाण्याचे चित्रीकरण रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले. हा क्रम पूर्ण सात दिवस चालू राहिला. तो फक्त २-३ तास झोप घ्यायचा. तो म्हणायचा की मी काय करू? हे माझे लग्न आहे, मला ते करावेच लागेल. तोपर्यंत ‘सिम्बा’ची रिलीज डेटही जाहीर झाली होती.”
विजय पाटकर म्हणाले की, आजपर्यंत त्यांनी असा कोणताही अभिनेता पाहिला नाही, जो इतरांच्या वेळेचा इतका आदर करतो. त्यांनी एक किस्सा सांगितला, रणवीर फक्त दोन मिनिटे उशिरा आला होता, त्याने सर्वांची माफी मागितली होती. ते म्हणाले, “मी कधीही एकाही अभिनेत्याला फक्त दोन मिनिटे उशिरा आल्याने सेटकडे धावताना पाहिले नाही. खूप ऊन होते आणि तो धावत आला आणि उशिरा आल्याबद्दल सर्वांची माफी मागितली.
मुलाखतीदरम्यान विजय पाटकर यांनी असेही सांगितले की, रणवीर सिंहने शूटिंगदरम्यान फक्त एक दिवस सुट्टी घेतली होती आणि तीही त्याच्या वाढदिवसा दिवशी. दीपिका पादुकोण त्याला भेटण्यासाठी हैदराबादला आली होती.
या चित्रपटात दिसणार रणवीर सिंह
रणवीर सिंहच्या पुढील चित्रपटाचे नाव ‘धुरंधर’ आहे, ज्याचे दिग्दर्शन आदित्य धर करत आहेत. यात संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि अक्षय खन्नासारखे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.