Rashmika Mandanna Post: दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर बॉलीवूडमध्येही चाहत्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना होय. अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देऊन इंडस्ट्रीवर राज्य करणारी रश्मिका मंदाना हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर रश्मिका व तेलुगू अभिनेता विजय देवरकोंडा यांनी आपलं नातं पुढे नेलं आहे.

रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांनी हैदराबादमध्ये साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याला दोघांचे कुटुंबीय व मोजकेच मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. विजय व रश्मिका लवकरच लग्न करणार आहेत. विजय देवरकोंडाच्या टीमने दोघांचा साखरपुडा व लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केलं आहे. साखरपुड्यानंतर विजय पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहिला. तिथे त्याच्या हातातील अंगठीने लक्ष वेधून घेतले.

विजय देवरकोंडाने त्यांच्या कुटुंबासह श्री सत्य साई बाबांच्या प्रशांती निलयम आश्रमात जाऊन आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्याचं स्वागत करण्यात आलं. चाहत्यांनी विजयचे बरेच फोटो व व्हिडीओ काढले आहेत. त्या फोटोंमध्ये त्याच्या बोटात अंगठी पाहायला मिळाली. साखरपुड्याच्या बातम्यांनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी पोहोचलेल्या विजयच्या हातातील अंगठी पाहून त्याच्या व रश्मिकाच्या लग्नाच्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.

पाहा पोस्ट

दरम्यान, रश्मिकाने साखरपुड्याच्या बातम्या आल्यावर इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली आहे. ही पोस्ट तिच्या साखरपुड्याबद्दल नाही, तर आगामी चित्रपट Thamma मधील ‘तुम मेरे न हुए’ या गाण्याबद्दल आहे.

रश्मिका मंदाना पोस्ट

“या गाण्यामागची गोष्ट अशी आहे की आम्ही एका अतिशय सुंदर ठिकाणी १०-१२ दिवस शूटिंग करत होतो. आणि शेवटच्या दिवशी आमचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना अचानक एक जबरदस्त कल्पना सुचली. ते म्हणाले, ‘आपण इथेच गाणं शूट केलं तर.. हे एक क्रेझी, कूल लोकेशन आहे’ आणि मलाही वाटलं का नाही.. मग आम्ही ३/४ दिवसांत इथेच सगलं शूट केलं. शेवटी हे गाणं पाहून आम्ही सगळे खूप चकित झालो,” अशी पोस्ट रश्मिकाने केली आहे.