scorecardresearch

रश्मिकाने विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, “आम्ही एकमेकांच्या…”

रश्मिकाला ती विजयला डेट करतेय का, असा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर तिने प्रतिक्रिया दिली.

रश्मिकाने विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, “आम्ही एकमेकांच्या…”
रश्मिका आणि विजयच्या डेटिंगच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुूरू आहेत. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांची पडद्यावरील केमिस्ट्रीचे चाहते अनेक जण आहेत. दोघांनी एकमेकांसह बरेच चित्रपट केलेत आणि ते चांगले मित्र आहेत, त्यामुळे रश्मिका आणि विजय यांच्या डेटिंगच्या चर्चा कायम सुरू असतात. मात्र दोघांनी कधीच या चर्चांना दुजोरा दिला नाही. आता पुन्हा एकदा रश्मिकाला ती विजयला डेट करतेय का, असा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर तिने प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – रश्मिका मंदानाने सांगितला ‘पुष्पा’ केल्यानंतरचा अनुभव; म्हणाली, “या चित्रपटामुळे देशभरातील प्रेक्षकांचा…”

‘Mashable’ ला दिलेल्या मुलाखतीत, डेटिंगच्या अफवांबद्दल विचारलं असता, रश्मिका म्हणाली, “हे सर्व खूप क्यूट आहे. मी अय्यू बाबूसारखी म्हणतेय की त्या अफवा खूप क्यूट आहेत. मी आणि विजय समविचारी आहोत, आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय, त्यामुळे आम्ही एकमेकांच्या जवळ आलो, आम्ही खूप चांगले मित्र आहोत. माझी गँग हैदराबादमध्ये आहे आणि त्याचीही गँग हैदराबादमध्ये आहे आणि आमचे बरेच कॉमन फ्रेंड्स आहेत. जेव्हा संपूर्ण जग ‘रश्मिका आणि विजय’ सारखे असते तेव्हा ते खूप क्यूट वाटतं.”

हेही वाचा – हृतिकचा ‘विक्रम वेधा’ पाहिल्यावर गर्लफ्रेंड आणि पूर्वाश्रमीच्या पत्नीने दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाल्या…

विजयबरोबर पुन्हा एकदा काम करण्याबद्दल रश्मिका म्हणाली, “मला त्याच्याबरोबर लवकरच काम करायचंय. जर आमच्यासाठी एखादी कथा असेल तर आम्ही तो चित्रपट लवकरच केला पाहिजे. खूप मज्जा येईल, आम्ही चांगले कलाकार आहोत, आम्ही दिग्दर्शकांना निराश करणार नाही,” असंही ती मिश्किलपणे म्हणाली.

हेही वाचा – Photos: रश्मिका मंदानाच्या उजव्या मनगटावर आहे टॅटू, अभिनेत्रीने स्वतःच सांगितला अर्थ

यापूर्वी विजय अनन्या पांडेबरोबर कॉफी विथ करणच्या सातव्या पर्वामध्ये पाहुणा म्हणून दिसला होता. शोमध्ये, अनन्याने विजयच्या डेटिंग लाइफबद्दल अप्रत्यक्षपणे माहिती दिली होती. पण विजयने मात्र यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. “माझ्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही दोन चित्रपट एकत्र केले आहेत. ती डार्लिंग आहे आणि मला आवडते. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही चित्रपटांद्वारे बरंच काही शेअर करतो,” असं तो म्हणाला होता.

हेही वाचा – अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, वाचा संपूर्ण यादी…

दरम्यान, रश्मिका सध्या तिचा बॉलिवूडमधील पदार्पण असलेल्या ‘गूडबाय’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती महानायक अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या