Rashmika Mandanna and Rakshit Shetty Engagement Photos Viral : अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्याबरोबर असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. रश्मिका मंदाना आणि विजयच्या कथित प्रेमसंबंधांची चर्चा नेहमीच होते आणि चाहतेही त्यांच्या नात्याबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात.
पण, काही वर्षांपूर्वी रश्मिकाचा साखरपुडा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याबरोबर झाला होता. वयाच्या २१ व्या वर्षी रश्मिकाने अभिनेता रक्षित शेट्टी याच्याबरोबर साखरपुडा केला होता. पण, दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही; अखेर रश्मिका आणि रक्षित यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
सध्या रश्मिका मंदाना आणि अभिनेता रक्षित शेट्टीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान, त्यांच्या नात्यात दुरावा का आला? आणि ते कशामुळे वेगळे झाले हे जाणून घेऊयात.
रश्मिकाने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रिक पार्टी’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटात रश्मिका आणि रक्षित यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. रश्मिकाचा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला. आज इंडस्ट्रीमध्ये रश्मिका हिचं नाव फार मोठं आहे. एवढंच नाही तर, रश्मिका हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
त्या चित्रपटावेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि वर्षभरात म्हणजेच जुलै २०१७ मध्ये त्यांनी साखरपुडा केला. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला फोटो तेव्हाचाच आहे, ज्यामध्ये हे दोघं सेम ड्रेसिंग स्टाईलमध्ये केक कापताना आणि अंगठी घालताना दिसत आहेत. रश्मिका या साखरपुड्याच्या वेळी फक्त २१ वर्षांची होती तर रक्षित ३४ वर्षांचा होता. अभिनेत्रीने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत कुटुंबात रक्षित याचं स्वागत केलं होतं. पण, त्यानंतरच्या एका वर्षातच त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांनी साखरपुडा मोडून टाकला. ते कधीच ब्रेकअपबद्दल बोलले नाहीत.
साखरपुडा मोडल्यानंतर रश्मिकाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलीवूडमध्येदेखील रश्मिकाने स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. रश्मिका मंदाना अलीकडेच ‘पुष्पा २’ आणि सलमान खानबरोबर ‘सिकंदर’ या चित्रपटात दिसली होती. दोन्ही चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.