हेल्थ कॉन्शियस हा शब्द हल्ली सगळ्यांच्या तोंडी सर्रास ऐकायला मिळतो. त्यामुळे डाएट हे सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलं आहे. ‘डाएट’ची योग्य व्याख्या सांगायची तर ती म्हणजे संतुलित असा आहार. आहाराच्या या पॅटर्नप्रमाणे नात्यांचं योग्य संतुलन राखणाऱ्या ‘Diet लग्न’ या नव्या पॅटर्नबद्दल सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री रसिका सुनील आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी चंद्रलेखा फाऊंडेशन निर्मित ‘Diet लग्न’ हे आगामी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलेशनशिपमध्ये योग्य समतोल साधण्यासाठी हे ‘Diet लग्न’ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो का? हे तपासायचं असल्यास रंगभूमीवर येणारं ‘Diet लग्न’ हे नवीन नाटक प्रेक्षकांनी नक्की पाहायला हवं. ‘रिलेशनशिप बॅलन्स करणारं क्रिस्पी नाटक’ अशा टॅग लाइनचं हे नाटक लेखिका मनस्विनी लता रवींद्र हिच्या लेखणीतून उतरलं आहे.

आणखी वाचा : “सुलोचना दीदी दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान, म्हणाले…

दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हे नाटकं दिग्दर्शित केलं आहे. या नाटकाद्वारे विजय केंकरे आपलं १०१वं नाटक दिग्दर्शित करीत आहे. आदित्य सूर्यवंशी आणि सविता सूर्यवंशी या नाटकाचे निर्माते आहेत. चांगल्या नाटकात उत्तम रंगकर्मींबरोबर काम करण्याची संधी मिळतेय, हे नक्कीच आमच्या दोघांसाठी आंनदायी असून आमचं हे ‘Diet लग्न’ प्रेक्षकांना खात्रीशीर मनोरंजनाची हमी देईल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. ऋता आणि आलोक या जोडप्याची ही कथा आहे. काही कारणाने बिघडलेला नात्याचा समतोल साधण्यासाठी हे दोघे समुपदेशकांनी सांगितलेला ‘Diet लग्न’ हा पर्याय स्वीकारतात.

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे करत असताना त्यांचे नातं कोणतं वळणं घेणार? हे मार्मिक पद्धतीने दाखविणारं हे नाटक आहे. रसिका सुनील, सिद्धार्थ बोडके, वैष्णवी आर पी या त्रिकुटाच्या ‘Diet लग्न’ च्या शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार ९ जून ला श्री.शिवाजी मंदिर, दादर दुपारी ४.०० वा. आणि शनिवार १० जून सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे दुपारी ४.३० वा. रंगणार आहे. ‘Diet लग्न’ नाटकाचे संगीत आनंद ओक यांचे आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे तर प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.