शाहरुख खानच्या ‘दिल से…’ या चित्रपटातील ‘छैया छैया’ हे गाण आज बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. हे गाणं २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. या गाण्यानं मलायकाला अरोराला रातोरात सुपरस्टार केलं. हे गाणं सुरुवातील अभिनेत्री रविना टंडनकडे आलं होतं. मात्र तिने या गाण्यावर नृत्य करण्यास साफ नकार दिला. विनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा आश्चर्यचकित करणारा किस्सा सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

का दिला रविनाने ‘छैया छैया’ गाण्याला नकार?

रविना म्हणाली, “वेळी मी कामात खूप व्यस्त होते माझ्याकडे सलग सहा चित्रपट होते. तसंच त्यानंतर खानसोबत मी चार चित्रपटात काम करणार होती. त्यामुळे मी ‘छैया छैया’ या गाण्यात नृत्य करण्यास नकार दिला होता. परंतू दूदैवाची बाब म्हणजे त्या चार पैकी ‘जमाना दीवाना’ हा केवळ एकच चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर जादू नावाचा एक चित्रपट मी शाहरुख सोबत करणार होते. या चित्रपटात ‘छैया छैया’ सारखंच एक गाणं होतं. मात्र तोही चित्रपट सुरु होताच बंद पडला.” हे कारण रविनाने टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

रविना टंडन कधीकाळी बॉलिवूडमधील आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. ९०च्या दशकात रविनाने रुपेरी पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अक्षय कुमार, गोविंदा, आमिर खान, सलमान खान अशा बॉलिवूडमधील जवळपास प्रत्येक सुपरस्टार अभिनेत्यासोबत तिने काम केले आहे. मात्र वाढत्या वयानुसार तिला मिळणाऱ्या कामात घट होत गेली. आणि आता तर ती केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raveena tandon malaika arora chaia chaia song mppg
First published on: 24-03-2020 at 19:12 IST