Raza Murad On Rumour That Rajesh Khanna Slapped Him : राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया हे बॉलीवूडमधील आवडत्या जोडप्यांपैकी एक होते. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हती.
डिंपल कपाडिया यांनी राज कपूर यांच्या ‘बॉबी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. जेव्हा डिंपल कपाडिया राजेश खन्ना यांना डेट करत होत्या, तेव्हा त्या त्यांचा सहकलाकार रझा मुराद यांच्याबरोबर वेळ घालवत असल्याच्या अफवा येऊ लागल्या. आता रझा मुराद यांनी या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या सर्व बातम्यांना बकवास म्हटले आहे.
‘फिल्मी चर्चा’ला दिलेल्या पॉडकास्टमध्ये रझा मुराद यांनी राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्याबद्दल बोलले. रझा मुराद म्हणाले, “त्या वेळी उर्वशी नावाचे एक वृत्तपत्र होते. ज्यामध्ये लिहिले होते की, रझा मुराद आणि डिंपल कपाडिया एकाच कारने फिल्मसिटीमध्ये आले होते. राजेश खन्ना तिथे शूटिंग करीत होते. जेव्हा ते डिंपलशी बोलू लागले तेव्हा रझा यांनी त्यांना त्यांच्याबरोबर येण्यास सांगितले, त्यानंतर राजेश खन्ना यांनी रझा मुराद यांना कानाखाली मारली.”
रझा मुराद यांची प्रतिक्रिया
रझा मुराद म्हणाले, “मी कधीही डिंपलबरोबर फिल्मसिटीला गेलो नाही किंवा अशी परिस्थिती उद्भवली नाही आणि मी, डिंपल व राजेश खन्ना एकाच ठिकाणी भेटलो नाही. मी राजेश खन्ना यांच्याबरोबर वेगळे आणि डिंपल यांच्याबरोबर वेगळे शूटिंग करायचो. या अफवांमध्ये एक टक्काही तथ्य नाही. हे १०० टक्के खोटे आहे.”
रझा मुराद पुढे म्हणाले, “तो लेख लिहिणाऱ्या पत्रकाराला एका ते पार्टीत भेटले होते. ते म्हणाले की,मी त्याच्याशी याबद्दल बोललो नाही. मी त्याला नेहमीप्रमाणेच भेटलो. कारण- जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या पार्टीत असता तेव्हा तुम्हाला ते बिघडवण्याचा अधिकार नाही. मी त्याच्याशी वाद घालू शकलो असतो किंवा त्याच्याशी भांडूही शकलो असतो. कारण- त्याने माझ्यावर इतके वाईट आरोप केले होते. पण ही दुसऱ्याची पार्टी होती. त्यामुळे तिथे कोणताही कटुता किंवा असभ्यपणा नसावा. म्हणून मी अगदी नॉर्मल राहिलो.”
मुराद यांनी डिंपल कपाडिया यांच्याबरोबर फिरोज खान यांचा ‘जानबाज’ (1986), डेविड धवन यांचा ‘आग का गोला’ यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.