करण जोहरचा शो ‘बिग बॉस ओटीटी’ सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये चारचॉंद लावण्यासाठी बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा यांची एण्ट्री होणार असल्याचं कळतंय. रेखा यांची एण्ट्री एका खास कारणासाठी असणार आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये रेखा यांच्या एन्ट्रीने शोमधील माहौल पूर्णपणे बदलून जाणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ शो सहा आठवडे चालणार आहे. त्यानंतर उर्वरित स्पर्धक हे ‘बिग बॉस 15’ मध्ये प्रवेश करतील. ‘बिग बॉस 15’ मध्ये सलमान खान या स्पर्धकांना एका घरात बंद करणार आहे आणि मग पुढचा खरा खेळ सुरू होणार आहे.

 

रेखा यांना दिली ही खास जबाबदारी

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये रेखा यांना मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतलाय. ‘ट्री ऑफ फॉर्च्यून’ नावाच्या एका शोमध्ये रेखा एका नवीन फिचरसाठी व्हॉईस ओव्हर देत असल्याचं बोललं जातंय. ‘बिग बॉस ओटीटी’ साठी आता पाच आठवडे शिल्लक आहेत. यानंतर, सलमान खानचा शो ‘बिग बॉस 15’ सुरू होताच धमाल करणार आहे. रेखा पहिल्याच दिवशी विशेष जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत.

रेखा पार पाडणार हे महत्त्वाचं काम

‘बिग बॉस १५’ मध्ये सलमान खानसोबत बिग बॉस ओटीटी मधील स्पर्धकांची ओळख करून देण्याचं महत्त्वाचं काम रेखा पाडणार आहेत. ‘ट्री ऑफ फॉर्च्यून’ स्वरूपात त्यांची ओळख करून देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, रेखा टॉप स्पर्धकांचे चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगून ते ‘बिग बॉस 15’ चा भाग घेऊ शकतात की नाही हे उघड करणार आहे. ‘बिग बॉस १५’ मध्ये प्रवेश करण्यासाठी ते स्पर्धक कसे मजबूत दावेदार ठरलीत हे देखील सांगणार आहेत. रेखा यांनी या शोसाठी डबिंग सुद्धा केलंय. जुहू इथल्या स्टूडिओमध्ये रेखा यांनी आपल्या डबिंगचं काम पूर्ण केलंय.

 

आणखी एका शोमुळे चर्चेत आल्या होत्या रेखा

यापूर्वी रेखा ‘गम है किस के प्यार में’ या टीव्ही शोमुळे चर्चेत आल्या होत्या. रेखा यांनी या शो चा नवीन प्रोमो शूट केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मीडिया रिपोर्टनुसार, रेखा यांनी या प्रोमोसाठी निर्मात्यांकडून 5 कोटी रुपये घेतले होते. हा प्रोमो वांद्रे इथल्या एका हॉटेलमध्ये शूट करण्यात आला. यामध्ये रेखा यांनी त्यांच्याकडील कांजीवरम साडी घातली आणि स्वतःचा मेकअपही केला होता.