साजिद खान दिग्दर्शित ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचे जुलैमध्ये चित्रीकरण सुरु होणार आहे. तत्पुर्वी या चित्रपटामध्ये झळकण्याची संधी कोणत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या ‘हाऊसफुल ४’साठी काही प्रमुख कलाकारांची नावे निश्चित झाली असून यामध्ये अक्षय कुमार, क्रिती सनॉन, बमन इरानी आणि रितेश देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या कलाकारांव्यतिरिक्त आणखी एका अभिनेत्रीचे नाव चित्रपटासह जोडले गेले आहे.

‘हाऊसफुल ४’ मध्ये क्रिती सनॉनची प्रमुख नायिका म्हणून निवड करण्यात आली असून सहकलाकार म्हणून पूजा हेगडेची निवड करण्यात आली आहे. क्रितीनंतर पूजाने या प्रोजेक्टसाठीच्या करारावर हस्ताक्षर केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जुलै महिन्यापासून लंडन येथे सुरू होणार आहे.

वाचा : Video: ‘मिजवान फॅशन शो’मुळे दीपिका-रणवीरमधील दुरावा मिटला?

दरम्यान, ‘हाऊसफुल ३’ हा चित्रपट ३ जून २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे लेखन तुषार हिरानंदानी आणि साजिद-फरहाद यांनी केले असून पटकथा साजिद- फरहाद यांनी लिहिली होती. ‘हाऊसफुल ३’ मध्येही रितेश देशमुख, अक्षय कुमार, बमन इरानी झळकले होते. तसेच त्यांच्याव्यतिरिक्त अभिषेक बच्चन, चंकी पांडे या अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाची जादू चालविली होती. ‘हाऊसफुल ३’ या चित्रपटाला हाऊसफुल १ आणि २ प्रमाणेच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र हाच प्रतिसाद ‘हाऊसफुल ४’ला मिळणार ही उत्सुकता निर्माण होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Report pooja hegde joins the housefull 4 gang
First published on: 25-04-2018 at 17:36 IST