अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयची विशेष टीम करत आहे. सध्या या तपासकार्याला वेग आला असून नवनवीन खुलासे समोर येत आहेत. यातच सुशांतला अखेरचं पाहिल्यानंतर रियाने ‘सॉरी बाबू’ हे उद्गार काढले होते. कूपर रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने ही माहिती दिली होती. परंतु, ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर #sorrybabu हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला आहे. नेटकऱ्यांनी विविध मीम्स करत सोशल मीडियावर ते शेअर केले आहेत.

१४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मुंबईतील रुग्णालयामध्ये त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. यावेळी रिया सुशांतचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी रुग्णालयात गेली होती. मात्र रुग्णालयातील शवगृहात सुशांतला पाहिल्यानंतर रियाला अश्रु अनावर झाले आणि ती रडू लागली. इतकंच नाही तर तिने अखेर ‘सॉरी बाबू’ असं म्हणत त्याची माफी मागितली होती.

दरम्यान, या घटनेनंतर नेटकऱ्यांनी रियावर टीकास्त्र डागलं आहे. अनेकांनी तिला खडेबोल सुनवत मीम्स व्हायरल केले आहेत.