“मोठ्या दु:खातून, मोठं बळ मिळतं”, रिया चक्रवर्तीची पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर रिया पुन्हा सक्रिय

Rhea-Chakraborty-jpg

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपतूच्या आत्महत्येला लवकरच एक वर्ष पूर्ण होतंय. 14 जूनला सुशांत सिह राजपूतने वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण बॉलिवूड हादरून गेलं. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्यांची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. रियावर सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सुशांतच्या आत्महत्याची चौकशी करत असताना ड्रग्स प्रकरणात रियाला एनसीबीने ताब्यात घेतलं. त्यानंतर जामिनावर रिया घरी परतली.

या सर्व प्रकरणानंतर रियाने सोशल मीडियाकडे पाठ वळवली होती. मात्र गेल्या काही महिन्य़ांपासून रिया पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचं दिसतंय. सुशांतच्या पहिल्या पुण्यतिथीला काही दिवस असताना रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. या ती म्हणालीय, “मोठ्या दु:खातून मोठं बळ मिळतं. तुम्हाला यावर फक्त माझा विश्वास ठेवावा लागेल..तिथेच थांबावं लागेल, लव्ह रिया”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

रियाच्या या पोस्टवर काही सेलिब्रिटींनी देखील कमेंट दिल्या आहेत. या रियाने मदर्स डेच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली होती. आईला केक भरवत असतानाचा बालपणीचा फोटो तिने शेअर केला होता.

आणखी वाचा: “ते आहेत तरी कोण? नशा करणारे लोक जे सहज…”, ट्विटरवर कंगना रणौतचा निशाणा

रिया ‘चेहरे’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत बिग बी अमिताभ बच्चन तसचं इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. करोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळे या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rhea chakraborty share post on instagram said from great suffering comes great strength kpw

ताज्या बातम्या