सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे. विकी-कतरिना, रणबीर-आलिया यांच्या पाठोपाठ आता अली फजल-रिचा चड्ढा हेदेखील लग्नबंधनात अडकणार आहेत. दिल्लीतल्या मोठ्या प्रतिष्ठित हॉटेलमध्ये लग्न, हटके पद्धतीने छापलेली लग्नपत्रिका यामुळे अली-रिचा यांच्या या लग्नसोहळ्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. रिचा व अलीच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झाली आहे. रिचाच्या हातावर अलीच्या नावाची मेहंदी सजली आहे.
हेही वाचा : “मी आणि दीपिका लवकरच…”, रणवीर सिंगने चाहत्यांना दिले खास सरप्राईज
रिचाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. एका रिपोर्टनुसार, रिचाच्या मेहंदीसाठी राजस्थानहून पाच आर्टिस्ट बोलवले होते. अलीच्या नावाचं पहिलं अक्षरही तिच्या मेहंदीमध्ये आहे. त्याचबरोबर रिचाकडे दोन मांजरी आहेत. एकीचं नाव जुगनी तर दुसरीचं नाव कमली आहे. या दोन्ही मांजरींवर रिचाचं प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे तिच्या मेहंदीत तिच्या दोन लाडक्या मांजरींचे स्केच आहे.


रिचा आणि अलीने त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास व्हॉईस मेसेजही शेअर केला आहे. यात अली आणि रिचाचा आवाज ऐकू आहे. या व्हॉईस मेसेजमध्ये त्यांनी सांगितले, “आम्ही दोन वर्षांपूर्वीच लग्न करण्याचे ठरविले होते. पण कोरोना महामारी आणि काही वैयक्तिक कारणाने आम्हाला आमचं लग्न पुढे ढकलावं लागलं होतं. आता अखेर आम्ही आमच्या कुटुंबाच्या, मित्रमंडळींच्या साक्षीने लग्न करणार आहोत. तुम्ही देत असलेल्या शुभेच्छांबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार.”
आणखी वाचा : चर्चा रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नपत्रिकेची; हटके अंदाजात दिले आग्रहाचे आमंत्रण
रिचा चढ्ढा आणि अली फजल ४ ऑक्टोबरला विवाहबद्ध होणार आहेत. ‘फुकरे’ च्या सेटवर हे दोघे प्रेमात पडले आणि तेव्हापासून दोघंही सोबत आहे.
अली-रिचा यांनी त्यांच्या लग्नानंतर मुंबईमध्ये खास रिसेप्शन सोहळा आयोजित केला आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांबरोबरच अली फजलचे काही हॉलिवूडमधले मित्रदेखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.