सोशल मीडिया स्टार ओरी नेहमीच त्याच्या फोटोजमुळे चर्चेत असतो. बॉलीवूड स्टार दीपिका पदुकोणपासून ते आलिया भट्ट, सारा अली खान आणि जान्हवी कपूरपर्यंत ओरी प्रत्येकाबरोबर त्याची सिग्नेचर पोज देऊन फोटो काढतो. आता बॉलीवूड शो, पार्टीज, अवॉड शो सगळीकडे ओरी दिसू लागला आहे आणि ओरीची प्रसिद्धी वाढू लागली आहे. त्याचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.

हॉलिवूड सेलिब्रिटी कायली जेनरबरोबर काढलेल्या फोटोमुळे ऑरी जास्त प्रसिद्ध झाला. आता जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाचं नावं यात जोडलं गेलं आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग सोहळ्यासाठी रिहानाला आमंत्रित करण्यात आलं होतं. अनंत आणि राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी रिहानाने खास परफॉर्मन्सही केला होता. ‘डायमंड्स’, ‘रुड बॉय’ या गाण्यांवर रिहानाने परफॉर्म केलं होतं. या सोहळ्याला ऑरीनेसुद्धा हजेरी लावली होती.

हेही वाचा… जगप्रसिद्ध गायक अ‍ॅकॉनने अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये केलं परफॉर्म, शाहरुख खानबद्दल म्हणाला, “या माणसाने मला…”

या सोहळ्यातील रिहाना आणि ओरीचे फोटो सोशल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता हेच फोटो ओरीने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ओरी आणि रिहानाने एकत्र पोज देऊन फोटो काढले आहेत. रिहानाला ओरीचे कानातले खूप आवडले होते. ओरीचे कानातले रिहाना सगळीकडे मिरवतानाही दिसली होती. रिहानाने ओरी, शाहरुख, अंबानी कुटुंबाबरोबर ओरीचे कानातले घालून फोटो काढले. हे फोटोज पोस्ट करत ओरीने कॅप्शनमध्ये लिहिल की, “माझे कानातले आता एका उत्तम ठिकाणी आहेत. त्यांना जामनगरमध्ये प्रेम सापडलं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ओरीबद्दल सांगायचं झाल्यास, बॉलीवूडमधील अनेक कलाकार ओरीला शाळेपासून ओळखतात. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर ही त्याची चांगली मैत्रीण आहे.