प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चन्ट यांचा प्री-वेडिंग सोहळा सध्या चर्चेत आहे. १ मार्च ते ३ मार्चदरम्यान जामनगर गुजरात येथे हा भव्य सोहळा पार पडला. भारतातीलच नव्हे तर जगभरातील अनेक प्रसिद्ध कलाकार, व्यावसायिक, गायक व राजकीय मंडळी यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

जगप्रसिद्ध गायक अ‍ॅकॉन याने आपल्या परफॉर्मन्सने कार्यक्रमाची शोभा वाढवली. अ‍ॅकॉनने या परफॉर्मन्सदरम्यान बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचे कौतुक केले आणि म्हणाला की, तो शाहरुखवर त्याच्या भावासारखंच प्रेम करतो. २०११ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘रावण’ या चित्रपटातील ‘क्रिमिनल’ आणि ‘छम्मक छल्लो’ गाण्यांसाठी शाहरुख आणि अ‍ॅकॉनने एकत्रित काम केलं होतं. ‘छम्मक छल्लो’ हे गाणं तेव्हा खूप प्रसिद्ध झालं होत.

Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
Girls intimate Holi Celebration Inside Delhi Metro
“अंग लगा दे रे, मोहे रंग…”, मेट्रोमध्ये तरुणींच्या अश्लील डान्समुळे ओशाळले प्रवासी! Viral Video पाहून संतापले नेटकरी
Ajith Kumar made biryani video viral
बाईकने रोड ट्रिपवर निघालाय सुप्रसिद्ध अभिनेता, कॅम्पमध्ये मित्रांसाठी बनवला खास पदार्थ, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा… VIDEO: प्री-वेडिंग सोहळ्यात अनंत अंबानीच्या ‘त्या’ कृतीने पाणावले मुकेश अंबानींचे डोळे; व्हिडीओ व्हायरल

अ‍ॅकॉनच्या परफॉर्मन्सवेळी ‘छम्मक छल्लो’ गाण्याची सुरुवात करण्याअगोदर त्याने शाहरुखचा हात धरून त्याला स्टेजवर आणले. शाहरुखच्या खांद्यावर हात ठेऊन अ‍ॅकॉन म्हणाला, “या माणसाने मला भारतात खूप मदत केली आहे. मी याच्यावर भावासारखे प्रेम करतो. शाहरुखचा माझ्यावर विश्वास होता. त्याने आजवर माझी नेहमी साथ दिली आहे.” शाहरुख मला म्हणाला होता की, “अ‍ॅकॉन, भारतातील प्रेक्षक तुझ्यावर खूप प्रेम करतील, त्यासाठी आपण एकत्र काम करायला हवं” आणि अशाप्रकारे आम्ही आज इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमांपैकी एक विक्रम बनवला.” त्यानंतर शाहरुखने त्याला मिठी मारली आणि अ‍ॅकॉन त्याला ‘लव्ह यू ब्रदर’ म्हणाला.

अ‍ॅकॉनच्या परफॉर्मन्सवर शाहरुख खान, त्याची मुलगी सुहाना, पत्नी गौरी यांनीही डान्स केला. अगदी भाईजान सलमान खानलाही डान्स करण्याचा मोह आवरला नाही.

हेही वाचा… नववधू पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांनी सिद्धिविनायकाचे घेतले आशीर्वाद, अभिनेत्रीने शेअर केला फोटो

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चन्ट यांच्या भव्य प्री-वेडिंग सोहळ्यात पॉपस्टार रिहानाने परफॉर्म करत कपलला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर बॉलीवूडचे तीन खान, दीपिका आणि रणवीर, सारा अली खान, जान्हवी कपूर, ख़ुशी कपूर, अनन्या पांडे अशा अनेक कलाकारांनी प्री-वेडिंग सोहळ्यात डान्स परफॉर्मन्स केले.