बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन चित्रपटांमध्ये फारसा दिसत नसला तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच चर्चेत असतो. लवकरच तो रितेश देशमुखच्या ‘कसे तो बना है’ या शोमध्ये दिसणार आहे आणि शोचा प्रोमो सध्या खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन त्याची लव्ह स्टोरी, चित्रपट या व्यतिरिक्त इतर काही विषयांवर बोलताना दिसत आहे. रितेश देशमुख त्याच्या ‘केस तो बनता है’ या कॉमेडी शोमुळे खूप चर्चेत आहे ज्यामध्ये सेलिब्रिटींना कोर्टरूममध्ये त्यांच्यावरील आरोपांना उत्तर द्यायचे आहे आणि या शोमध्ये रितेशनं अभिषेकवर सेटवरील सामान चोरल्याचा आरोप लावला आहे.

‘केस तो बनता है’ या शोमध्ये अभिषेक बच्चनवर रितेशनं सेटवरील सामान चोरीचा आरोप लावला. रितेशच्या या आरोपावर अभिषेकनं हजरजबाबीपणे त्याला उत्तर दिलं ज्यामुळे तिथे उपस्थित सर्वांना हसू आवरेनासं झालं. या व्हिडीओमध्ये रितेश म्हणतोय, “अभिषेक बच्चन चित्रपटांच्या सेटवरून बरेच प्रॉप्स चोरतात. ‘गुरू’च्या सेटवरून त्यांनी…” रितेशचं बोलणं संपण्याआधीच अभिषेक बच्चन गंमतीने म्हणतो, “हिरोईन (ऐश्वर्या राय बच्चन) चोरली.” यावर सर्वजण हसू लागतात.

आणखी वाचा- “माझं सेक्स लाइफ…” तापसीने सांगितलं ‘कॉफी विथ करण’मध्ये न दिसण्याचं धक्कादायक कारण

याशिवाय, ‘केस तो बनता है’च्या प्रोमोच्या वेगवेगळ्या क्लिप चर्चेत आहेत, ज्यामध्ये विकी कौशल, पंकज त्रिपाठी, शाहिद कपूर, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा देखील दिसत आहेत. दरम्यान अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याचा ‘दासवी’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये यामी गौतम आणि निम्रत कौर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तुषार जलोटा दिग्दर्शित हा चित्रपट एप्रिल २०२२ ला प्रदर्शित झाला होता.

आणखी वाचा- वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेश देशमुखच्या नव्या कॉमेडी शोबद्दल बोलायचं तर अमेझॉन मिनी टीव्हीवर येणारा शो ‘केस तो बनता है’ देशातील पहिला कोर्ट कॉमेडी शो आहे, ज्यामध्ये रितेश सेलिब्रिटींवर आरोप करताना दिसत आहे. या शोमध्ये वरुण शर्मा सेलिब्रिटींचा बचाव करताना दिसत आहे आणि कुशा कपिला जजच्या भूमिकेत आहे. करण जोहर, करीना कपूर, अनिल कपूर, रोहित शेट्टी, वरुण धवनपासून ते सारा अली खानपर्यंत अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी होणार आहेत.