बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. रितेश आणि जिनिलिया हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. रितेशने नुकताच हे एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशने जांभळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तर जिनिलियाने गुलाबी रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला रितेश बोलतो की, “ईमेलने कितीही प्रगती केली असली तरी ते स्त्रियांपेक्षा जलदगतीने बातमी पोहोचवू शकत नाही.” रितेश असं बोलतं असताना जिनिलिया फोनमध्ये व्यस्त असल्याचे दिसते. त्या दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : माझ्या हत्येचा कट रचला जातोय; सारेगमप विजेती वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट; म्हणाली “आज मला…”

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.