बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघे ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यावेळी जेनेलियाने त्या दोघांचा एक रोमॅन्टिक कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
जेनेलियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत दोघेही रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहेत. मात्र, यावेळी त्या दोघांचा रोमान्स सुरु असताना तिसरा कोणी येतो आणि त्या रोमान्यचे रुपांतर हसण्यात होते. या व्हिडीओत जेनेलियाने नारंगी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर रितेशने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. या दोघांच्यामध्ये तिसरा हा त्यांचा पाळिव कुत्रा आला आहे. त्यांचा हा कुत्रा त्यांच्यामध्ये येऊन दोघांच्या गालावर चाटू लागतो. त्यांचा कुत्रामध्ये आल्यानंतर जेनेलियाला हसू कोसळतं. तर, दुसरीकडे रितेशचे हावभाव हे बघण्यासारखे आहेत.
आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट
View this post on Instagram
रितेश आणि जेनेलियाने यांची भेट ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. हा चित्रपट २००३मध्ये झाला. त्यानंतर त्यांनी ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या चित्रपटात एकत्र काम केले. नंतर त्या दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना दोन मुलही आहेत.