रितेश देशमुखने अनेक विनोदी चित्रपटातून आपले सुरेख कॉमिक टायमिंग दाखवून दिले आहे. ‘ग्रॅण्ड मस्ती’ या त्याच्या ‘फुल ऑन कॉमेडी’ चित्रपटाने तर १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान पटकावले. पुलकित सम्राटच्या ‘फुक्रे’ या पहिल्याच चित्रपटाला चांगले यश मिळाले. या चित्रपटातील त्याच्या कामाचेदेखील कौतुक झाले. आता हे दोघे ‘बंगिस्तान’ नावाच्या चित्रपटात एकत्र येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण अन्शुमन याचे असून, फरहान अख्तर आणि रितेश सिध्वानी निर्माता आहेत. चित्रपट समिक्षकाचे काम केल्यानंतर करणने आता दिग्दर्शनाच्या क्षेत्राकडे मोर्चा वळवला आहे. धमाल-मस्ती असलेल्या या चित्रपटात रितेश आणि पुलकितने बिनधास्त तरूणांची भूमिका साकारली आहे. एका दहशतवादी गटाला सुधारण्याच्या मोहीमेवर असलेले हे दोघे कोणती उलाढाल आणि किती मस्ती करतात, हे या चित्रपटात पाहायला मिळेल.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2013 रोजी प्रकाशित
‘बंगिस्तान’मध्ये रितेश देशमुख आणि पुलकित सम्राट
रितेश देशमुखने अनेक विनोदी चित्रपटातून आपले सुरेख कॉमिक टायमिंग दाखवून दिले आहे. 'ग्रॅण्ड मस्ती' या त्याच्या 'फुल ऑन कॉमेडी' चित्रपटाने तर १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान पटकावले.

First published on: 24-12-2013 at 03:20 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh and pulkit samrat in bangistan