बॉलिवूडमधील क्यूट कपल रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया कायमच स्पॉटलाइटमध्ये असतात. रितेश आणि जिनिलियाच्या जोडीला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसते. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून जिनिलियाने रितेशसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर जिनिलियाला चाहत्यांनी मोठी पसंती मिळाली होती. तिचा ‘जाने तू या जाने ना’ हा सिनेमा खास करून तरुणांमध्ये सुपरहिट ठरल होता.

या सिनेमातील गाणी लोकप्रिय ठरली होती. त्यासोबत एक सीनदेखील चांगलाच लोकप्रिय ठरला होता. ज्यात जिनिलियाने साकारलेल्या अदितीला तिचा होणारा नवरा म्हणजेच सुशांत म्हणजेच अभिनेता अयाज खान कानशिलात लगावतो. अयाजने जिनिलियाच्या कानशिनात लगावल्याचा राग अजूनही रितेशच्या डोक्यातून काही गेलेला दिसत नाही आणि म्हणूनच त्याने अयाजचा बदला घेतला आहे. नुकताच अयाजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात रितेश देशमुख अयाजला बेदम मारताना दिसतोय. हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत अयाजने कॅप्शनमध्ये लिहिलं, “हा द्वेष कधी संपेल का?” तर अयाजने यात रितेश आणि जिनिलियाला टॅग केलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अयाजने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी देखईल मोठी पसंती दिली आहे. मालिकांमधून अयाजने करिअरला सुरुवात केली होती. ‘दिल मिल गये’ या मालिकेतील त्याची भूमिका विशेष गाजली होती. याशिवाय तो कुलवधू, पर‍िचय, पुनर्व‍िवाह, लौट आओ तृष्णा या मालिकांमध्ये झळकला होता. तर ब्लफमास्टर, हनीमून ट्रैवल्स प्राइवेट लिमिटेड, चश्मे बद्दूर या सिनेमातूनही त्याने विविध भूमिका साकारल्या होत्या.