scorecardresearch

रितेश देशमुखने ‘हा’ खास व्हिडीओ शेअर करत माधुरी दीक्षितला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Riteish Deshmukh, madhuri dixit,
रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आज बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा वाढदिवस त्यानिमित्ताने रितेशने एक व्हिडीओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंज व्हायरल झाला आहे.

रितेशने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश आणि माधुरी सलमान खानच्या ‘किक’ या चित्रपटातील ‘जुमे की रात है’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “Queen Of Hearts सगळ्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या माधुरी मॅमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे हे वर्ष आनंदी जावो”, असे कॅप्शन रितेशने दिले आहे.

आणखी वाचा : लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहून माधुरीचे पती डॉ नेने, म्हणाले “मी यांना…”

आणखी वाचा : मराठीतला आजवरचा सर्वात BOLD टीझर, तेजस्विनी पंडीतच्या ‘रानबाजार’ची झलक पाहिलीत का?

दरम्यान, रितेश नेहमीच त्याची पत्नी जिनिलियाचे मजेशीर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. रितेश ‘बाघी ३’ या चित्रपटात दिसला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Riteish deshmukh shared a video of him and madhuri dixit dancing on her birthday dcp