आरएसवीपीने आपल्या होमग्रोन हॉरर-कॉमेडी ‘ककुड़ा’ या चित्रपटाची घोषणा केली असून रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम अभिनित या चित्रपटाचे शूटिंग आजपासून सुरू झाले आहे. ‘ककुड़ा’ या चित्रपटातून आदित्य सरपोतदार हिंदीमध्ये आपले दिग्दर्शकीय पदार्पण करत असून या आधी त्यांनी प्रेक्षक आणि समीक्षकांनी गौरवलेले ‘क्लासमेट्स’, ‘मौली’ आणि ‘फास्टर फेणे’ सारखे चित्रपट दिले आहेत.
‘ककुड़ा’मध्ये कॉमेडी पाहायला मिळणार आहे. एका गावाला मिळालेल्या विचित्र अभिशापाची ही कहाणी आहे. या तिघांचा सामना एका अशा भूतासोबत होतो, ज्यात्यासोबत थोडावेळ राहिल्यानंतर अंधविश्वास, परंपरा आणि प्रेमावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहतात.
View this post on Instagram
चित्रपटाबाबत बोलताना, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले की, “मी रोनी स्क्रूवाला यांच्यासोबतच्या या सहयोगासाठी अतिशय उत्साहित आहे. हा चित्रपट इतर व्यावसायिक चित्रपटांच्या तुलनेत कणभरदेखील कमी नाही. कास्टिंग अतिशय चोख आहे आणि कथानक तुम्हाला तुमच्या खुर्चीला खिळवून ठेवेल आणि विचारप्रवृत्त करेल.”
आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
रितेश देशमुख म्हणतो की, “मी सोनाक्षी आणि साकिबसोबत या चित्रपटात काम करण्यासाठी आणखी वाट नाही पाहू शकत. मला स्वतःला हॉरर-कॉमेडी पट आवडतात आणि ‘ककुड़ा’ मध्ये मला ते सगळं करायला मिळणार आहे.”
आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट
चित्रपटाचे लेखन प्रतिभावान जोडगोळी अविनाश द्विवेदी आणि चिराग गर्ग यांनी केले असून चित्रपटाचे एसोसिएट निर्माता सलोना बैंस जोशी यांच्याद्वारा विकसित करण्यात आली आहे.
‘ककुड़ा’ आरएसवीपीची प्रस्तुती आहे. या डायरेक्ट-टू-डिजिटल हॉरर-कॉमेडी चित्रपटाचे चित्रीकरण गुजरातच्या विविध भागात सुरू झाले असून हा चित्रपट २०२२ च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.