‘बोकड’, ‘पैशाचा पाऊस’ अशा चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिकांतून सुरू केलेल्या वाटचालीला आता खरा वेग ‘दुर्वा’ मालिकेतील ‘अभिनेत्री’च्या भूमिके ने आला, ही माझ्यासाठीची दिवाळी भेट होय. आता ग्लॅमर आणि अभिनय या दोन्हीना उत्तम संधी लाभली आहे. चित्रपटात दिवाळी निमित्ताने माझे फोटोसेशन ही झाले. म्हणजे व्यावसायिक कामातून प्रत्यक्षातील दिवाळीच्या आनंदाकडे अशी ही वाटचाल आहे. संतोष जुवेकरसोबत एका मराठी चित्रपटातून मी भूमिका साकारली आहे. मलेशियामध्ये त्याचे चित्रीकरण झाले. इतरही मराठी चित्रपटासाठी विचारणा सुरू असते, पण त्यात विशेष काही करण्यासारखे नसते. त्यापेक्षा मी पुण्यात कुटुंबासोबत रमेन. ते प्रत्येक क्षण दिवाळीचा आनंद देणारेच.
शब्दांकन – दिलीप ठाकूर
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2015 रोजी प्रकाशित
‘अभिनेत्री’ची भूमिका दिवाळी भेट – अतुला दुगल
खरा वेग 'दुर्वा' मालिकेतील 'अभिनेत्री'च्या भूमिके ने आला, ही माझ्यासाठीची दिवाळी भेट होय.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 11-11-2015 at 14:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Role in durga serial is diwali gift for me atula dugal