राजामौली दिग्दर्शित दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ची सध्या चांगलीच चर्चा आहे. चित्रपटाने एक-दोन नव्हे तर तब्बल तीन पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. यामध्ये गोल्डन ग्लोब, क्रिटिक्स चॉइस फॉर बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म आणि सिएटल फिल्म क्रिटिक्स असोसिएशनच्या पुरस्काराचा समावेश आहे. राजामौलीच्या ‘आरआरआर’ला बेस्ट अॅक्शन कोरिओग्राफीसाठी सिएटल क्रिटिक ॲवॉर्ड देण्यात आला आहे.

ऑस्करसाठी ‘RRR’ ऐवजी ‘छेल्लो शो’ची निवड का झाली? ज्युनिअर एनटीआर कारण सांगत म्हणाला, “तिथं बसलेल्या…”


गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर ‘आरआरआर’ चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असताना आणखी एका गोष्टीने लक्ष वेधून घेतलं. ती म्हणजे चित्रपटातील मुख्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरची अमेरिकन अॅक्सेंट होय. ग्लोब्स रेड कार्पेटवर टीमसह मीडियाच्या काही प्रश्नांची उत्तरं ज्युनिअर एनटीआरने अमेरिकन अॅक्सेंटमध्ये दिली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. काही जणांनी त्याचं कौतुक केलं, तर काहींनी त्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. अशातच आता अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, ज्युनियर एनटीआरने फेक अॅक्सेंटमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली. “भारतीय सिनेमा आणि हॉलिवूडमध्ये फारसा फरक नाही. केवळ वेळ आणि उच्चार (अॅक्सेंट) या बाबतीत आपण त्यांच्यापेक्षा थोडे वेगळे आहोत. याशिवाय दोन्ही इंडस्ट्रीतील कलाकार एकाच प्रक्रियेतून जातात,” असं तो म्हणाला.

‘RRR’ने पटकावला तिसरा पुरस्कार! सर्वोत्तम अ‍ॅक्शन कोरिओग्राफीसाठी जिंकला ‘हा’ ॲवॉर्ड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘आरआरआर’ जागतिक स्तरावर पुरस्कार जिंकत आहे, पण हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री नाही. तरीही चित्रपट अजून ऑस्करच्या शर्यतीत आहे. एकामागे एक पुरस्कार जिंकणारा ‘आरआरआर’ ऑस्कर जिंकेल की नाही, हे पुरस्कार सोहळ्यातच कळेल. सध्या तरी चित्रपटाची टीम इतर पुरस्कारांचा आनंद साजरा करत आहे.