scorecardresearch

ऑस्करसाठी ‘RRR’ ऐवजी ‘छेल्लो शो’ची निवड का झाली? ज्युनिअर एनटीआर कारण सांगत म्हणाला, “तिथं बसलेल्या…”

‘आरआरआर’ नाही तर गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ हा भारताची ऑस्करमधील अधिकृत एंट्री आहे.

ऑस्करसाठी ‘RRR’ ऐवजी ‘छेल्लो शो’ची निवड का झाली? ज्युनिअर एनटीआर कारण सांगत म्हणाला, “तिथं बसलेल्या…”
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सध्या राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटाची जागतिक स्तरावरही चर्चा आहे. चित्रपटाने ‘नाटू नाटू’ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला. तसेच त्या बेस्ट फिल्म इन फॉरेन लँग्वेजसाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्डही मिळाला. असं असूनही ‘आरआरआर’ नाही तर गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ हा भारताची ऑस्करमधील अधिकृत एंट्री आहे. हा चित्रपट भारताची अधिकृत एंट्री का आहे, याचं ‘आरआरआर’मधील मुख्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरने कारण सांगितलं आहे.

सुशांतसिंह राजपूतचा पाळीव श्वान ‘फज’चं निधन, ट्वीट करत बहीण म्हणाली, “मित्राबरोबर स्वर्गात…”

‘व्हरायटी’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, ज्युनियर एनटीआरने ऑस्कर २०२३ साठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून ‘RRR’ ची निवड का करण्यात आली नाही याबद्दल खुलासा केला. “मला वाटत नाही की ऑस्करसाठी कोणता चित्रपट पाठवला जावा, यावर राजकारण होत असावं. तिथं बसलेल्या पॅनलला माहीत आहे की खूप उत्तम काम करतात. हिंदी ही बऱ्याच काळापासून राष्ट्रीय भाषा आहे आणि म्हणूनच तिला महत्त्व प्राप्त झालं आहे. तुम्ही ‘आरआरआरला’ निवडा किंवा निवडू नका, पण चित्रपटाने आम्हाला जगभरात अभिमानीत केलंय,” असं ज्युनिअर एनटीआर म्हणाला.

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसिलदारांनी बजावली नोटीस, नेमकं काय आहे कारण

‘आरआरआर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. चित्रपटाने गोल्डन ग्लोब आणि क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकत जगभरात नावलौकीक मिळवलं आहे. हा चित्रपट राजामौली यांनी दिग्दर्शित केला असून राम चरण व ज्युनिअर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका होत्या. आलिया भट्ट देखील चित्रपटाचा एक भाग होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 13:16 IST

संबंधित बातम्या