राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई तर केलीच, पण जागतिक स्तरावरही हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने काही दिवसांपूर्वी मानाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला. त्यानंतर क्रिटिक्स चॉइस ॲवॉर्डही जिंकला. आता पुन्हा एकदा या चित्रपटाने एक पुरस्कार पटकावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘RRR’ ठरला परदेशी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट! जगभरातील चित्रपटांना मागे टाकत पटकावला क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड

१७ जानेवारी रोजी, सिएटल फिल्म क्रिटिक्स असोसिएशनने २०२२ च्या पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये एसएस राजामौलीच्या आरआरआरला बेस्ट अॅक्शन कोरिओग्राफीसाठी सिएटल क्रिटिक ॲवॉर्ड देण्यात आला. त्यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

प्रेम रक्षित आणि दिनेश कृष्णन यांनी चित्रपटातील गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं. तर, विकी अरोरा, इव्हान कोस्टाडिनोव्ह, निक पॉवेल आणि रायचो वासिलिव्ह हे RRR साठी स्टंट को-ऑर्डिनेटर होते.

“अन् मी दीड तास बाथरुममध्ये…”; गोल्डन ग्लोब विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्याच्या कोरिओग्राफरची प्रतिक्रिया चर्चेत

दरम्यान, ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर कोरिओग्राफर प्रेम रक्षित भावूक झाला होता. एवढा मोठा पुरस्कार मिळेल, असं वाटलं नव्हतं. पुरस्कार मिळाल्याचं कळाल्यावर मी बाथरूममध्ये दीड तास रडत होतो, असं प्रेम रक्षितने सांगितलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rrr wins seattle critics award for best action choreography hrc
First published on: 18-01-2023 at 08:48 IST