Rubina Dilaik Tells Her Relatives Compare Skin Tone Of Twin Daughters : हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘छोटी बहू’मध्ये राधिकाची भूमिका साकारून अभिनेत्री रुबिना दिलैकने घराघरात आपले नाव निर्माण केले होते.
‘छोटी बहू’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुबिना दिलैकने २०२३ मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला. जीवा आणि एधा अशी तिच्या मुलींची नावे आहेत.
टीव्हीची बॉस लेडी रुबिना दिलैक सध्या तिच्या जुळ्या मुलींमुळे चर्चेत आहे, ज्यांना तिने २०२३ मध्ये जन्म दिला. अभिनेत्रीने तिच्या मुलींची नावे एधा आणि जीवा ठेवली आहेत, ज्यांचे फोटो ती अनेकदा चाहत्यांबरोबर शेअर करते.
आता रुबिनाने तिच्या नवीनतम ब्लॉगमध्ये एधा आणि जीवाबद्दल असा खुलासा केला आहे. हे ऐकून सर्व जण थक्क झाले आहेत. अभिनेत्रीने सांगितले की, तिच्या मुलींच्या रंगामुळे तिला नातेवाइकांकडून टोमणे मारले जातात.
माझ्या मुलींच्या रंगामुळे नातेवाईक मला टोमणे मारतात : रुबिना
खरे तर, रुबिना दिलैक तिच्या कामाबरोबरच यूट्यूबवर एक ब्लॉगिंग चॅनेलदेखील चालवते. त्यावर अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करते. तिच्या नवीनतम ब्लॉगमध्ये रुबिना तिच्या मुली एधा आणि जीवाबद्दल बोलताना दिसली. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या मुली फक्त दीड वर्षाच्या आहेत; पण मला त्यांच्या रंगामुळे गोष्टी ऐकाव्या लागतात. कारण- माझी एक मुलगी थोडी गोरी आहे आणि दुसरी थोडी सावळी आहे. अशा परिस्थितीत जो कोणी त्यांना पाहतो, तो त्यांची तुलना करू लागतो.”
रुबिना पुढे म्हणाली, “माझ्या घरात या गोष्टी मला सहन होत नाहीत. फक्त बाहेरचेच नाही, तर कधी कधी माझ्या कुटुंबातील सदस्यही मला याबद्दल सल्ला देऊ लागतात. ते म्हणतात की, तू तिला मसूरची पेस्ट किंवा उबटन का लावत नाहीस. त्यामुळे तिचा रंगही गोरा होईल. मी त्यांना लगेच उत्तर देते की, मी हे करणार नाही. मी माझ्या मुलींना नेहमीच सांगते की, तुम्ही तुम्ही सुंदर आहात, निर्भय आहात.”
या शोमध्ये दिसणार रुबिना दिलैक
रुबिना दिलैकचा ‘लाफ्टर शेफ्स २’ हा कुकिंग शो आता संपला आहे. लवकरच ही अभिनेत्री तिचा पती अभिनव शुक्लाबरोबर ‘पती, पत्नी और पंगा’ या नवीन शोमध्ये दिसणार आहे. शोचा प्रोमो देखील रिलीज झाला आहे.