Entertainment News Today, 26 July 2025 : अभिनेत्री रुची गुज्जरने निर्माता करण सिंह चौहानविरुद्ध तक्रार दिली आहे. चौहानने २४ लाख रुपयांची फसवणूक केली, विश्वासघात आणि धमकी दिल्याचा आरोप रुचीने केला आहे. २४ जुलै २०२५ रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे प्रकरण एका हिंदी टीव्ही मालिकेच्या सह-निर्मितीशी संबंधित आहे. जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान रुचीची कंपनी, एसआर इव्हेंट अँड एंटरटेनमेंटने करण सिंह चौहानची फर्म, के स्टुडिओ आणि इतर खात्यांमध्ये २४ लाख रुपये ट्रान्सफर केले असा दावा तिने केला आहे.

करणने व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला होता आणि स्वतःची सोनी टीव्हीवरील एका हिंदी मालिकेचा निर्माता म्हणून ओळख करून दिली होती, असा आरोप रुचीने केला. “त्याने मला मालिकेची सह-निर्माती व्हायची ऑफर दिली आणि प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे पाठवली. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने पैसे ट्रान्सफर केले. मात्र मालिकेचे काम सुरू झालेच नाही. नंतर ते पैसे चित्रपटात गुंतवल्याचं त्याने सांगितलं. आता पैसे परत मागितल्यावर तो धमकावत असल्याचा आरोप रुचीने केला आहे. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

Live Updates

Entertainment News Updates : मनोरंजन न्यूज अपडेट

18:53 (IST) 26 Jul 2025

Bigg Boss OTT 3 फेम अभिनेत्याची फसवणूक, जवळच्या मित्राने लाखों रुपयांना गंडवलं; नेमकं प्रकरण काय?

'बिग बॉस ओटीटी ३'मधील अभिनेत्याची व्यवसायात फसवणूक, जवळच्या मित्रानेच केला विश्वासघात ...वाचा सविस्तर
18:30 (IST) 26 Jul 2025

तीन वर्षांत मोडलेलं आईचं पहिलं लग्न, प्रसिद्ध अभिनेता तिच्या घटस्फोटाबद्दल म्हणाला, "एके रात्री अचानक ते…"

“तिचं पहिलं लग्न अपयशी ठरलं अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्याचं आईच्या घटस्फोटाबद्दल विधान; म्हणाला, “तिची बाजू…” ...वाचा सविस्तर
18:09 (IST) 26 Jul 2025

ALTT वरील बंदीनंतर एकता कपूरने दिले स्पष्टीकरण; म्हणाली, "माझा आणि माझ्या आईचा या प्लॅटफॉर्मशी…"

Ekta Kapoor Clarification After Government Bans Altt App : सरकारने ALTT वर बंदी घातल्यानंतर एकता कपूरने दिलं स्पष्टीकरण; म्हणाली... ...सविस्तर वाचा
18:00 (IST) 26 Jul 2025

पहिलं लग्न मोडलं, दुसऱ्या लग्नात फसवणूक; प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली "गेल्या एका वर्षात अनेक वेळा…"

Dalljiet Kaur Went on Fitness Journey and Shared Video : 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ...वाचा सविस्तर
17:06 (IST) 26 Jul 2025

अनुपम खेर अजूनही भाड्याच्या घरात राहतात, नेमकं कारण काय? म्हणाले, "माझ्या मृत्यूनंतर…"

Anupam Kher Doesn't Own House : अनुपम खेर अजूनही भाड्याच्या घरात राहतात, स्वत:च केला खुलासा; दिलं 'हे' कारण ...सविस्तर बातमी
16:01 (IST) 26 Jul 2025

५९ व्या वर्षीही सिक्स पॅक ॲब्स आणि डॅशिंग लूक्स, बॉलीवूडचा किंग इतका फिट कसा? पाहा शाहरुख खानचा डाएट चार्ट

Shah Rukh Khan Daily Fitness and Diet Routine : ५९ व्या वर्षीही शाहरुख खान स्वतःला कसा ठेवतो फिट? जाणून घ्या ...सविस्तर बातमी
15:52 (IST) 26 Jul 2025

पत्नी ऐश्वर्या की आई जया बच्चन, अभिषेक कोणाला घाबरतो? बहीण श्वेता म्हणाली, "त्याला सर्वात जास्त भीती…"

Abhishek Bachchan is scared of wife Aishwarya Rai Bachchan : अभिषेक कोणाला घाबरतो, त्याची पत्नी की त्याची आई? ...वाचा सविस्तर
15:47 (IST) 26 Jul 2025

"मी हिंदीमध्ये बोलणार…", अक्षय कुमार १२ वर्षांनी रॅम्पवर परतल्यानंतर असं का म्हणाला?

Akshay Kumar Returns To Ramp Walks After 12 Years : अक्षयच्या या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...सविस्तर वाचा
15:42 (IST) 26 Jul 2025

"कुर्बानी ठीक, पण त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर का?", निक्की तांबोळीचं स्पष्ट मत; म्हणाली, "धर्माच्या नावाखाली…"

Nikki Tamboli On Veganism And Qurbani Videos : '"कुर्बानी देणं मी मान्य करते पण...", निक्की तांबोळीने व्यक्त केलं मत; म्हणाली, "ईदच्या दिवशी..." ...सविस्तर वाचा
14:35 (IST) 26 Jul 2025

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने दिला सुखद धक्का, शेअर केले साखरपुड्याचे फोटो, होणारी बायको आहे तरी कोण?

Marathi Actor's Engagement Photo : लोकप्रिय मराठी अभिनेत्याने उरकला साखपुडा, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी... ...सविस्तर बातमी
14:08 (IST) 26 Jul 2025

९ वर्षांचं प्रेम! सुनील शेट्टीच्या आंतरधर्मीय लग्नाला होता आई-वडिलांचा विरोध; पत्नीबद्दल म्हणाला, "...तर ती नक्कीच सोडून जाईल"

"मला अनेकांनी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता," सुनील शेट्टीचे वक्तव्य ...सविस्तर बातमी
13:51 (IST) 26 Jul 2025

"त्यांना फिल्टरपाड्यात घेऊन जाईन आणि…", गौरव मोरेने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर; म्हणाला, "समोर आले तर…"

Gaurav More Reaction On Trolling : "मी कोणालाच घाबरत नाही", गौरव मोरेची ट्रोलिंगवर स्पष्ट प्रतिक्रिया, म्हणाला, "समोरासमोर आले तर..." ...सविस्तर बातमी
13:37 (IST) 26 Jul 2025

"आम्ही चुकल्यावर वेळोवेळी तुम्ही कान पकडले…", 'चला हवा येऊ द्या' नव्या पर्वासाठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट; म्हणाली, "१० वर्षे…"

Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचं नवीन पर्व आजपासून सुरू होणार, अभिनेत्रीची खास पोस्ट... ...अधिक वाचा
13:30 (IST) 26 Jul 2025

मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला, "तिला खूप…"

"सुंदर मुलींच्या आजूबाजूला....", लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या अभिनेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत ...सविस्तर वाचा
13:27 (IST) 26 Jul 2025

"तू म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर प्रसिद्ध अभिनेत्रीचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, "तीन महिने एकत्र राहतात अन्…"

Zareen Khan On Marriage : सोशल मीडियाद्वारे अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना लग्न करण्यासाठी आग्रह करताना दिसतात. ...सविस्तर बातमी
11:46 (IST) 26 Jul 2025

"सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल"

Suneel Darshan says Sunny Deol was the darkest chapter of my life : ...वाचा सविस्तर
11:35 (IST) 26 Jul 2025

"तुम्ही ३ मालिकांचं नुकसान करताय…", 'सावळ्याची जणू सावली'ची वेळ बदलली; 'झी मराठी'ला मेघा धाडेची विनंती, म्हणाली…

Zee Marathi Serial : 'झी मराठी'ने बदलली ३ मालिकांची वेळ; 'सावळ्याची जणू सावली'साठी मेघा धाडेची कमेंट, म्हणाली... ...वाचा सविस्तर
10:34 (IST) 26 Jul 2025

"माझ्या मुलींच्या रंगामुळे नातेवाईक मला…", प्रसिद्ध अभिनेत्री जुळ्या मुलींबद्दल म्हणाली, " त्यांची तुलना करू लागतो अन्…"

Rubina Dilaik Tells Her Relatives Compare Skin Tone Of Twin Daughters : या अभिनेत्रीने २०२३ मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला. ...वाचा सविस्तर
10:29 (IST) 26 Jul 2025

'बिग बॉस' 19 चा लोगो बदलला; निर्मात्यांनी सलमान खानच्या शोची दाखवली पहिली झलक, पाहा व्हिडीओ

Bigg Boss 19 First Look Out : 'बिग बॉस १९'ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...सविस्तर वाचा
09:56 (IST) 26 Jul 2025

प्रियांका चोप्रासह केलं पदार्पण, नंतर सिनेमे ठरले फ्लॉप; मराठमोळी अभिनेत्री १८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याबरोबर राहतेय लिव्ह इनमध्ये

Mugdha Godse Rahul Dev live in relationship : मुग्धा व राहुल गेल्या १२ वर्षांपासून एकत्र आहेत. ...सविस्तर बातमी

ruchi gujjar

रुची गुज्जर (फोटो - इन्स्टाग्राम)