नावाजलेल्या व्यक्तींना दूषण लावणं हा कमाल आर खान याचा जन्मसिद्ध हक्कच बनला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मोहनलाल यांची खिल्ली उडवली होती. तर ‘बाहुबली २’ सिनेमाचे अभिनेते प्रभास आणि राणा डग्गुबत्ती यांच्याविरोधात भाष्य केले होते. या सगळ्यांमध्ये कमालने आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमातील फातिमा सना शेखला ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ सिनेमात का घेतलं, असा प्रश्न उपस्थित केला होता. आता हे कमी की काय त्याने आपला मोर्चा सचिन तेंडुलकरकडे वळवला आहे. केआरकेने सचिनच्या आत्मचरित्रपटावर भाष्य करताना म्हटले की, ‘हा सिनेमा जुन्या व्हिडिओंनी बनवलेला सिनेमा आहे. पण हा सिनेमा झेलणं माझ्यासाठी कठीण आहे.’
‘विरुष्का’चा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘ये साथ छुटेना’!
या सिनेमाच्या ट्रेलरमध्येच हे स्पष्ट झाले होते की हा सिनेमा एमएस धोनीच्या सिनेमासारखा नसणार. पण तो मात्र धोनी आणि तेंडुलकर यांच्या सिनेमांची तुलनाच करत आहे. त्याने एका मागोमाग एक असे अनेक ट्विट केले आणि ‘सचिन: अ बिलियन ड्रिम्स’ सिनेमाला धोनीच्या सिनेमापेक्षा ४० ते ५० टक्क्यांनी जास्त स्क्रीन्स मिळाल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी हा सिनेमा ९ ते १० कोटी रुपयांचा गल्ला कमावू शकतो. तर धोनी सिनेमाची कमाई सुशांतमुळे नाही तर स्वतः धोनीमुळे झाली होती. ‘राबता’ सिनेमाचे यश हे सुशांतचे असेल. या सिनेमावेळी त्याचे स्टारडम कळेल. जर सचिनच्या या ड्रॉक्युमेंट्रीने जास्त कमाई केली तर कपिल, सेहवाग, कोहली, गंभीर आणि इतर खेळाडूही त्यांच्या डॉक्युमेंट्री बनवतील.
https://twitter.com/kamaalrkhan/status/867055386817437696
https://twitter.com/kamaalrkhan/status/868000981639942145
https://twitter.com/kamaalrkhan/status/868001526140325889
https://twitter.com/kamaalrkhan/status/868008626086174721
https://twitter.com/kamaalrkhan/status/868009288601657344
स्वघोषित समीक्षक म्हणून सचिनच्या सिनेमावर टीप्पणी करताना कमाल म्हणाला की, कोणाच्याही जीवनपटापेक्षा माझ्या आयुष्यावर बनवलेला सिनेमा अधिक रंजक असेल. कारण यात पुरेपुर मसाला असेल. सेक्स, गुन्हेगारी, प्रेम, व्यवसाय, बॉलिवूड अशा अनेक गोष्टींचा भरणा यात असेल.