दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी सहजसुंदर अभिनयाबरोबरच नो-मेकअप लुक, भन्नाट डान्समुळे नेहमी चर्चेत असते. आता साई बहिणीच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीची बहीण पूजा कननचा नुकताच पारंपरिक पद्धतीत, थाटामाटात साखरपुडा पार पडला. याचे फोटो साईने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री साई पल्लवीची बहीण पूजाचा लाँगटाईम बॉयफ्रेंड विनीत कननशी २१ जानेवारीला साखरपुडा झाला. अभिनेत्रीने काल फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. साईने साखरपुड्यातील खास क्षण शेअर करत कॅप्शन लिहिलं, “माझ्या लहान बहिणीचा साखरपुडा झाला यावर माझा विश्वास बसत नाहीये. जीजू तुला माहित नसेल तू आयुष्यात काय मिळवलं आहेस. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आणि आमच्या कुटुंबात तुझं स्वागत आहे.” साईच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह तिचे चाहते पूजाला साखरपुड्याच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचा – Pooja Sawant Birthday: ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंतचं प्राणीमय जग

साखरपुड्यात पूजाने आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने सारख्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर साईने ऑफ व्हाइट रंगाची आणि पिवळी किनार असलेली साडी नेसली होती. या साडीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम कोमल कुंभार लवकरच झळकणार नव्या भूमिकेत, स्टार प्रवाहच्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, साईच्या बहिणीने २०२१मध्ये ‘चिथिरै सेव्वानम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. साईच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती ‘एसके २१’मध्ये झळकणार आहे. ज्यामध्ये साई शिवकार्तिकेयनबरोबर दिसणार आहे. याशिवाय ‘थंडेल’ चित्रपटात नागा चैतन्यसह साई पाहायला मिळणार आहे.