सैफ अली खानच्या ‘भूत पोलीस’ या आगामी सिनेमाचं पोस्टर सोमवारी रिलीज झालंय. मात्र सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच केवळ पोस्टर रिलीज होताच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘भूत पोलीस’ सिनेमांचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर सिनेमाला विरोध होवू लागला असून सैफ अली खानवर देखील टीका करण्यात येत आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये सैफ अली खानच्या मागे काही हिंदू साधु दिसत असल्याने हा वाद पेटला आहे.

‘भूत पोलीस’ हा सिनेमा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असून यात सैफ सोबतत अभिनेता अर्जुन कपूर तसचं यामी गौतम आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं पोस्टर लॉन्च होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे. बॉलिवूड सिनेमांमध्ये कायम हिंदू संत किंवा देव देवतांनाच लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. या पोस्टरमध्ये सैफ अली खानच्या मागे एक नागा बाबा ध्यान करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला आणखी एक साधु बाबा उभं असल्याचं दिसतं आहे.

हे देखील वाचा: “७५ वर्षांची म्हातारी दिसतेयस”; करीना कपूरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

यात एका नेटकऱ्याने तर सरसंघचालक मोहन भागवत यांनाचा प्रश्न विचारला आहे. युजर म्हणाला, “मोहन भागवतजी ‘भूत पोलीस’ सिनेमाच्या बॅकग्राउंडला हिंदू संत का आहेत? बॉलिवूड कायमच हिंदू संतांचा अपमान करत आलं आहे.” असं म्हणत या नेटकऱ्याने बॉलिवूडवर टीका केलीय.

हे देखील वाचा: रणवीर सिंहच्या बर्थ डेला करण जोहरचं सरप्राइज; ‘या’ सिनेमात रणवीर-आलिया झळकणार एकत्र

या आधी देखील हिंदूत्वाच्या मुद्दयावरून सैफ अली खानची ‘तांडव’ ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्य़ात अडकली होती. त्यानंतर या वेब सीरिजमध्ये काही बदल करण्यात आले होते. बॉलिवूडमध्ये फिल्स मेकर्सकडून अनेकदा हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आला आहे. बॉलिवूड फिल्म मेकर्स केवळ हिंदू धर्म, हिंदू देव-देवतांना लक्ष्य करतात इतर धर्माच्या बाबतीत मात्र ते असं करत नाहीत असा आरोप कायम सोशल मीडियावरून अनेक नेटकऱ्यांनी केला आहे.