“अचानक घरात एक अनोळखी महिला घुसली आणि मला पाहून म्हणाली…”, सैफने सांगितला तो धक्कादायक अनुभव

राणी मुखर्जीसोबत चर्चा करत असताना सैफने हा अनुभव सांगितला आहे.

saif ali khan, kareena kapoor,
राणी मुखर्जीसोबत चर्चा करत असताना सैफने हा अनुभव सांगितला आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट बंटी और बबली २च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने त्याच्या आणि करीनासोबत घडलेल्या एका घटने विषयी सांगितलं आहे. एकदा एक अनओळखी स्त्री त्यांच्या घरात आली होती आणि तो प्रचंड घाबरला होता, असा खुलासा सैफने केला आहे.

रानी मुखर्जीशी बोलताना सैफने हा खुलासा केला आहे. एकदा एक महिला त्याच्या घरात काही न सांगता आली असं म्हणतं सैफ म्हणाला, “जुन्या घरात असताना एका महिलेने बेल वाजलवली. त्यानंतर एका मुलाने दरवाजा उघडला आणि ती माझ्याकडे बघून म्हणाली, तर तू इथे राहतोस.”

आणखी वाचा : करिश्मा कपूरने सांगितला ‘त्या’ किंसिंग सीन शूट दरम्यानचा किस्सा

आणखी वाचा : आई बंगाली आणि वडील जर्मन मग मुस्लीम आडनाव का लावते दिया मिर्झा?

हे ऐकल्यानंतर रानीला आश्चर्य वाटले आणि ती म्हणाली ‘कोणी तुझ्या बिल्डिंगमध्ये कसं येऊ शकतं?’ त्यावर सैफ म्हणाला की “मला माहित नाही. ती खूप आत्मविश्वासाने सरळ चालत आली. तिने चांगले कपडे घातलेले होते म्हणून तिला कोणी थांबवलं नसेल. तिने दारावरची बेल वाजवली, ती आत आली. मी आणि माझी पत्नी करीना दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहत होतो. मी तर खरोखर घाबरलो होतो आणि करीना म्हणाली, ‘तू काही बोलणार नाहीस का?’ मला काय बोलावे तेच कळत नव्हते. मी विचार करत होतो. मी या व्यक्तीला ओळखतो का? असा विचार मी करत होतो. त्यानंतर मी म्हणालो, ‘मला वाटतं तू जायला हवं. तू इथे काय करतेस? ती ठीक आहे म्हणाली आणि मग मागे वळून बाहेर गेली.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Saif ali khan says once an unknown woman walked into their house and kareena asked him is he not going to say something dcp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या