scorecardresearch

सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिमचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, करण जोहरसोबत करणार ‘हे’ काम

इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे मात्र तो अभिनय करणार नाही असा खुलासा सैफने केला आहे.

सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिमचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, करण जोहरसोबत करणार ‘हे’ काम
(File Photo)

बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक म्हणजे सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान. इब्राहिमदेखील वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये करियर करणार अशा चर्चा काही दिवसांपूर्वी रंगत होत्या. तसचं करण जोहरच्या मदतीने इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असंही वृत्त होतं. मात्र आता स्वत: सैफ अली खाननेच या गोष्टीचा खुलासा केला आहे. इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार मात्र तो अभिनय करणार नाही असा खुलासा सैफने केला आहे.

इब्राहिम करण जोहरला त्याच्या आगामी सिनेमात असिस्ट करणार असल्याचं सैफने सांगितलंय. करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम काहीन’ या सिनेमासाठी इब्राहिम त्याला दिग्दर्शनात अस्टिट करणार आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम काहीन’ या सिनेमात रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन अशी मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. आरजे सिद्धार्थला दिलेल्या मुलाखतीत सैफने मुलांसोबत असलेल्या नात्याचा खुलास केला होता. “इब्राहिमसोबत मी त्याच्या कामाबद्दल चर्चा करतो. तर सारा सर्वात मोठी असल्यानी तिच्यासोबत एक वेगळच नातं आहे.”असं सैफ म्हणाला होता.

सारा अली खाननंतर आता इब्राहिमदेखील बॉलिवूडमध्ये त्याच्या कामाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झालाय. तर एका मुलाखतीत करीना कपूरने तिच्या दोन्ही मुलांनी सिनेमात येऊ नये अशी इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणाली होती,”मला आवडेल जर तैमूर माझ्याकडे येऊन मला माऊंट एव्हरेस्ट सर करायचाय असं बोलेल. मुलांना जे करायचंय त्यासाठी माझा त्यांना कायम पाठिंबा असेल मात्र त्यांनी सिनेस्टार बनावं अशी माझी इच्छा नाही” असा खुलासा करीनाने केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Saif ali khan son ibrahim will assist karan johar in upcoming film kpw

ताज्या बातम्या