सैफ अली खान सध्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता प्रेक्षक ‘विक्रम वेधा’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘विक्रम वेधा’मध्ये सैफ एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्याचा एक डॅशिंग अंदाज यामध्ये पाहायला मिळेल. बरीच वर्ष रुपेरी पडद्यावर काम केल्यानंतर कंटाळा येतो का? तसेच अजूनही तो कशाप्रकारे मेहनत घेतो याबाबत सैफने सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर सुपरफ्लॉप चित्रपटही आपल्या वाट्याला आले असल्याचं सैफने सांगितलं.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

सैफ नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या करिअरबाबत खुलेपणाने बोलत होता. तो म्हणाला, “तुम्ही लहान मुलांसारखं नेहमीच उत्साही असलं पाहिजे. मी ५२ वर्षांचा आहे ही माझ्यासाठी दुःखद गोष्ट आहे. ठराविक वय वर्षानंतर लोक काम करणं सोडतात. अभिनयक्षेत्र हा एक असा व्यवसाय आहे जिथे तुम्हाला मनाने तरुण असण गरजेचं असतं.”

“माझा धर्मच सिनेमा आहे. सिनेमामध्येच काम करत असल्याने मी शिस्तबद्ध व निरोगी राहतो. किशोरवयात माझं मन स्थिर नव्हतं. आपण सगळेच पैश्यांसाठी कधी एक तर कधी दुसरंच काम करतो. पण प्रत्येक काम आनंद तसेच उत्साहाने करणं गरजेचं आहे. जे चित्रपट करण्यामध्ये मला अजिबात रस नव्हता अशा चित्रपटांमध्ये एण्जॉय करत काम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण नंतर मला याचा त्रास व्हायचा.”

आणखी वाचा – लालबाग-काळाचौकी अन् चाळीतलं घर; कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचा खऱ्या आयुष्याबाबत खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैफने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये विविध भूमिका साकारल्या. ‘विक्रम वेधा’ हा त्यापैकीच एक चित्रपट आहे. सैफसह या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत काम करताना दिसेल. येत्या शुक्रवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.