‘लय भारी’ या चित्रपटातून रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलं. ‘मुंबई फिल्म कंपनी’ बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती रितेशच्या पत्नीने म्हणजेच जेनेलिया देशमुखने केली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांचं धम्माल मनोरंजन करण्यासाठी सज्ज असून एका नवीन मराठी चित्रपटाची निर्मिती जेनेलिया करत आहे. रितेश पुन्हा एकदा प्रेक्षकांना मराठी चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी ऐकायला मिळाली. तर यामध्ये रितेशसोबत कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. या चित्रपटातून अभिनेत्री सैयामी खेर मराठीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माऊली’ या चित्रपटातून सैयामी मराठीत पदार्पण करत असून लवकरच शूटिंगला सुरुवात करणार आहे. ‘मिर्झियाँ’ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत तिने भूमिका साकारली होती. आता रितेश- जेनेलियाच्या चित्रपटात तिची नेमकी कोणती भूमिका असेल, याबाबत अद्याप काही स्पष्ट करण्यात आले नाही.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहसोहळ्यात पाहुण्यांनी जेवणाचा डबा घरूनच आणावा?

‘लय भारी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आता मराठीत अभिनय करण्याची माझी उत्सुकता अजूनच वाढली आहे. मला साहसदृश्य आणि मनोरंजनपूर्ण चित्रपटांमध्ये झळकायला आवडेल. विशेष म्हणजे ‘माऊली’ चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करण्याचा निर्णय मी घेतल्याचे रितेशने सांगितलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saiyami kher makes her marathi film debut cast opposite riteish deshmukh in his next production mauli
First published on: 07-05-2018 at 11:27 IST