बॉलीवूड अभिनेत्री डेझी शाह हिने सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. अलीकडेच डेझीने सलमान खानच्या महिलांच्या पोशाखांविषयीच्या विशेष विचारसरणीबद्दल सांगितले. तिने शूटिंगदरम्यानच्या एका किस्सा सांगितला, जेव्हा सलमान खानला अभिनेत्रीचा ड्रेस खूप लहान वाटला आणि नंतर त्याने तिला ब्लँकेटने झाकण्याचा सल्ला दिला होता.
सलमान खान हा अशा स्टार्सपैकी एक आहे, ज्या महिलांबरोबर तो काम करतो, त्यांच्या कपड्यांबद्दल त्यांचा विशिष्ट दृष्टिकोन आहे. त्याचं स्पष्टपणे म्हणणं आहे की, महिलांनी सेटवर लहान कपडे आणि डीप नेकलाइन असलेले कपडे घालू नयेत. अलीकडेच ‘हॉटरफ्लाय’शी झालेल्या संभाषणात, डेझी शाहला विचारण्यात आले की, सलमान खान सेटवर महिलांसाठी सुरक्षित वातावरण कसे निर्माण करतो.
सलमान खानला नाईट ड्रेस खूप लहान वाटला : डेझी शाह
डेझी शाहने सांगितले की, सलमान खानचा असा विश्वास आहे की, महिलांना चित्रपटांमध्ये शोपीस म्हणून सादर करू नये. तो म्हणतो की, तुम्ही एखाद्या मुलीला जितके जास्त झाकाल, तितकी ती अधिक सुंदर दिसेल. डेझी शाहने शूटिंगमधील एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, “माझा एक ड्रेस घालायचा एक सीन होता, ज्यामध्ये मला सकाळी लवकर उठताना दाखवण्यात आले होते. सलमानला माझा ड्रेस थोडा विचित्र वाटला म्हणून त्याने मला तो ब्लँकेटने झाकण्यास सांगितले. त्याच्या मते, तो नाईट ड्रेस खूप लहान होता.”
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सलमान खानने लडाखमध्ये त्याच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ या वॉर ड्रामा फिल्मचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात सलमान खानबरोबर अभिनेत्री चित्रांगदा सिंहदेखील दिसणार आहे.
चित्रपटाच्या कलाकारांमध्ये जेन शॉ, अंकुर भाटिया, हर्षिल शाह, हीरा सोहल, अभिलाष चौधरी व विपीन भारद्वाज असे कलाकार दिसतील. जून २०२० मध्ये लडाखच्या उंचावरील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. त्या घटनेवर ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट आधारित आहे.