बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. शेरा हा सलमानचा चांगला मित्र देखील आहे. या दोघांमध्ये नेहमीच एक खास बॉन्डिंग दिसून येतं. सलमान खान प्रमाणेच शेरा देखील सोशल मीडियावर बराच सक्रीय असतो. नुकताच त्यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये शेरा डान्स करताना दिसत आहे.

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा सध्या राजस्थानमध्ये आहे. त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो काही राजस्थानी फोक डान्सर्ससोबत थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातील ‘दगाबाज’ हे गाणं ऐकू येत आहे आणि शेरा देखील हे गाणं गात त्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यानं लिहिलं, ‘राजस्थान स्वतःच्याच बेस्ट अंदाजात.’

View this post on Instagram

A post shared by shera (@beingshera)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खान आणि शेरा यांचं नेहमीच एक खास नातं पाहायला मिळालं आहे. एका मुलाखतीत सलमानसोबतच्या बॉन्डिंगबद्दल बोलताना शेरा म्हणाला होता, ‘सलमानची आणि माझी पहिली भेट झाली त्यावेळी मी Whigfield च्या शोची सेक्युरीटी पाहत असे. त्यानंतर मी सलमानला दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा हॉलिवूड अभिनेता Keanu Reeves भारतात आला होता आणि त्यावेळी ‘स्पीड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मी पहिल्यांदा सलमानसाठी चंदीगढमध्ये काम केलं होतं आणि त्यानंतर मी त्याच्यासाठीच काम करत आहे.