Salman Khan Broke Glass Bottle on Somy Ali Head : अभिनेता सलमान खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. सलमान खानने आजपर्यंत लग्न केलेले नसले तरी त्याचे नाव अनेक बॉलीवूड अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. सलमान खानचे नाव अभिनेत्री सोमी अलीशी देखील जोडले गेले आहे. सोमी अलीने एकदा एका वरिष्ठ पत्रकाराला सांगितले होते की तिला सलमान आवडतो, पण ती खूप घाबरते, कारण सलमान खान खूप लवकर रागावतो.
हिंदी रशशी संवाद साधताना, ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी अनेक बॉलीवूड स्टार्सबद्दल सांगितले. सोमी अलीबद्दल बोलताना पूजा यांनी सांगितले की, त्यावेळी सोमी त्यांची चांगली मैत्रीण होती. पूजा यांनी सांगितले की सोमीने त्यांना सांगितले होते की ती सलमानवर प्रेम करते. ती म्हणाली होती, “मला सलमान आवडतो, तो माझ्यावर प्रेम करतो की नाही हे मला माहीत नाही, पण कधीकधी मला भीती वाटते, कारण तो खूप लवकर रागावतो.”
पूजा म्हणाल्या, “एकदा सोमी अली तिच्या मैत्रिणींबरोबर एका रेस्टॉरंट-बारमध्ये कोल्ड्रिंक्स पित होती. सलमान तिथे आला आणि रागाच्या भरात त्याने सोमी अलीच्या डोक्यावर बाटली फोडली होती. ही घटना अनेक वर्षांपूर्वी घडली होती, पण त्यावेळी ती चर्चेचा मोठा विषय होती.”
यानंतर सोमी अलीने पूजा यांना एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत सोमी अलीने त्याने असे का केले होते हे सांगितले. सोमी अलीने त्यावेळी सांगितले होते की सलमान खान खूप पझेसिव्ह आहे, म्हणूनच त्याने असे केले.
अभिनेत्री ऐश्वर्या रायबरोबर डेटिंग करण्यापूर्वी सलमान खान सोमी अलीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. असं म्हटलं जातं की, ते दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आणि सोमी अली १९९१ ते १९९९ पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचं अफेअर आठ वर्ष चाललं. १९९९ मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर सोमी अली अमेरिकेला परत गेली. तिनं तिथेच तिचं शिक्षण पूर्ण केलं. सोमी अलीने बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ती २००७ पासून ‘नो मोर टीयर्स’ नावाची एक एनजीओ चालवते.