श्वेता तिवारीची मुलगी पलकने जिंकलं सलमान खानचं मनं, ‘बिजली’ गाण्यासाठी भाईजानने दिल्या शुभेच्छा

पलक तिवारीचं हार्डी संधूसोबतचं बिजली बिजली हे गाणं नुकतच रिलीज झालंय.

salman-khan-palak-tiwari

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने चाहत्यांची मोठी पसंती मिळवली आहे. श्वेता तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी देखील ओळखली जाते. श्वेता पाठोपाठ आता तिची मुलगी देखील अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. श्वेताची मुलगी पलक तिवारीने अभिनय बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत करियरची सुरुवात केलीय. एवढचं नव्हे तर करियरच्या सुरुवातीलाच तिने बॉलिवूडच्या भाईजानचं मनं जिंकलं आहे.

पलक तिवारीचं हार्डी संधूसोबतचं बिजली बिजली हे गाणं नुकतच रिलीज झालंय.या गाण्यात पलकचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. तर सलमान खानने पलक तिवाऱीच्या या गाण्याचा टीझर त्याच्या अधिकृत इस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने पलकला शुभेच्छा दिल्या आहेत. तसचं तिचं कौतुकही केलंय. “या तडफदार गाण्यासाठी पलक आणि हार्डी दोघांना शुभेच्छा” असं सलमान कॅप्शनमध्ये म्हणाला. तर पलकने देखील सलमानचे आभार मानले आहेत.

“लोकांचं हे अज्ञान आहे”; मस्कुलर बॉडीवरून तापसी पन्नूला ट्रोल करणाऱ्यांना कृष्णा श्रॉफचा सल्ला


आजवर अनेक नव्या कलाकारांना सलमान खानने कायम सपोर्ट केला आहे. तसचं बॉलिवूडमध्ये जम बसवण्यास मदत केली आहे. त्यामुळे करियरच्या सुरुवातीला पलकला सलमानने दिलेलं प्रोत्साहन महत्वाच ठरणार आहे. लवकरच पलकचा बॉलिवूडमधील पहिला सिनेमा रिलीज होणार आहे.

तर पलक तिवारीच्या या गाण्याला सोशल मीडियावरही मोठी पसंती मिळतेय. दोन दिवसात या गाण्याला यूट्यूबवर १० मिलियनहून अधिक व्हूज मिळाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan congratulates shweta tiwari daughter pakal for her new bijali song share post kpw

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या