“लोकांचं हे अज्ञान आहे”; मस्कुलर बॉडीवरून तापसी पन्नूला ट्रोल करणाऱ्यांना कृष्णा श्रॉफचा सल्ला

कृष्णाने जीमबद्दल किंवा वेट ट्रेनिगबद्दल गैरसमज असणाऱ्यांना सल्ला दिला आहे.

krishna-shroff-taapsee-pannu

अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा बॉलिवूडपासूनच दूर राहणचं पसंत करते. असं असलं तरी कृष्णा तिच्या फिटनेसमुळे चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती सक्रिय असून बोल्ड फोटो शेअर करत असते. अनेकदा कृष्णाला ट्रोल केलं जातं मात्र ट्रोल करणाऱ्यांना ती कायम सडेतोड उत्तर देत असते. यावेळी देखील कृष्णाने ट्रोल करणाऱ्यांना एक सल्ला दिला आहे. मात्र यावेळी तिने तापसी पन्नूला तिच्या शरीरावरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलीच शिकवण दिलीय.

नुकत्याच ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कृष्णाने तिच्या फिटनेस प्रेमाबद्दल खुलासा केला आहे. यावेळी तिने मस्कुलर बॉडीविषयी असलेल्या काही गैरसमजांवर देखील भाष्य केलं. यावेळी कृष्णाला तापसी पन्नूच्या ट्रोलिंगवरून प्रश्न विचारण्यात आला होता. ‘रश्मी रॉकेट’मधील मस्क्युलर लूकसाठी तापसीला ट्रोल करण्यात आलं होतं यावर कृष्णाला तिचं मत विचारण्यात आलं. उत्तर देत ती म्हणाली “खरं तर हे खूपच त्रासदायक आहे की लोकांचं हे अज्ञान आहे. मला वाटतं या गैरसमजावरून लवकरच पर्दाफाश होईल. वेटस् ट्रेनिंगमुळे तुम्ही वजदार होत नाहीत तर तुमचा आहार यात महत्वाचा आहे. जर तुम्ही लंच आणि डिनरमध्ये पिझ्झा बर्गर खात असाल तर तुमचं वजन नक्कीच वाढेल. वेटस् घेऊन व्यायाम केल्याने तुमचे मसल्स म्हणजे स्नायू वाढतात. चरबीपेक्षा शरिरात स्नायूंना कमी जागा लागते. त्यामुळे मग तुम्ही बारीक आणि टोण्ड दिसता. हे अगदी साध आणि सोप आहे त्यामुळे उगीच गैरसमज वाढवू नका” असं म्हणत कृष्णाने जीमबद्दल किंवा वेट ट्रेनिगबद्दल गैरसमज असणाऱ्यांना सल्ला दिला आहे.

KBC 13: “माझ्या पोटावर पाय दिला”, कतरिनाच्या डायलॉगवर बिग बी म्हणाले…

तापसीने काही दिवसांपूर्वी तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘रश्मि रॉकेट’ या चित्रपटातील एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तापसीची पाठ दिसत आहे. तापसीची ही पोस्ट पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली होती. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. एका नेटकऱ्याने, ‘पुरुषासारखी बॉडी असणारी ही फक्त तापसी पन्नू असु शकते,’ अशी कमेंट केली होती. या ट्रोल करणाऱ्यांना तापसीने देखील सडेतोड उत्तर दिलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Krishna shroff on taapsee pannu shamed for her muscular body kpw

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या